Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअनिल देशमुखांचे चिरंजीव सलील यांनी राष्ट्रवादीचे सदस्यत्व सोडले, प्रकृती अस्वस्थतेचे दिले कारण

अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील यांनी राष्ट्रवादीचे सदस्यत्व सोडले, प्रकृती अस्वस्थतेचे दिले कारण

नागपूर

- Advertisement -

सलील देशमुख यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे. त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे सांगितले. गेल्या चार-पाच महिन्यांपासून अस्वस्थ प्रकृतीमुळे ते पक्षाच्या कामातून दूर होते.

YouTube video player

सलील देशमुख यांनी पक्षाकडून मिळालेल्या मानाचा आणि आदराचा उल्लेख केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना खूप दिले असल्याचेही सांगितले. मात्र, सध्या प्रकृतीवर लक्ष केंद्रित करून काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा लोकसेवेत सक्रिय होण्याचा त्यांचा मानस आहे.

त्यांनी स्पष्ट केले की, पक्ष संघटनेत त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते आणि फक्त सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय केवळ आरोग्यासाठी विश्रांती घेण्याच्या उद्देशाने घेतला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....