Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAnjali Damania : "धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरोधात…"; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

Anjali Damania : “धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरोधात…”; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांचा घोटाळा बाहेर काढला. घनवट यांनी शेतकऱ्यांना धमकी देत राजकारणी लोकांच्या मदतीने जमिनी लाटल्या असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. तसेच धनंजय मुंडे यांच्याबाबत अंजली दमानिया यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना दमानिया म्हणाल्या की, “राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल कंपनीबद्दल म्हणजेच जी फ्लाय अॅश महाजेनको कडून घ्यायची आणि मोठ्या प्रमाणावर विकायची. ज्याबाबत मी अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीमध्ये संचालक पदावर जे आहेत ते दोनच आहेत एक आहेत राजश्री धनंजय मुंडे दुसरे आहेत राजेंद्र घनवट”, अशी माहिती अंजली दमानियांनी पत्रकार परिषदेत दिली.

YouTube video player

पुढे त्या म्हणाल्या की, “तिसरा फोटो जगमित्र शुगर नावाची कंपनी आहे त्याच कंपनीत राजेंद्र घनवट (Rajendra Ghanwat) संचालक आहेत. या कंपनीत वाल्मिक कराडही होता. पोपटलाल घनवटही या कंपनीत आधी संचालक होते. यांनी काय केलं आहे? माझ्याकडे ११ शेतकऱ्यांचे तपशील आहेत, त्या सगळ्यांना छळलं आहे. एका शेतकऱ्याची २० कोटींची जमीन होती त्याचा व्यवहार ८ लाखांत केला. एकाची एक कोटीची जमीन होती त्याला ४ लाख रुपये दिले. जे जे त्यांच्या विरोधात लढले त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आणि त्यांचा छळ केला”, असा आरोपही दमानिया यांनी केला.

तसेच “धनंजय मुंडे पाच वर्षापूर्वी तेजस ठक्कर नावाच्या माणसाला सोबत घेऊन आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे कागदांचा मोठा गठ्ठा होता. त्यामधून मी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा विषय मांडावा असा आग्रह त्यांनी केला. मात्र, मी धनंजय मुंडे यांना सांगितले की मी असं कुणी काही दिलेल्या कागदांवर काम करत नाही. पण मी बीडचा विषय लावून धरला तेव्हा राजेंद्र घनवट यांचे नाव एका चॅनलच्या डिबेटमध्ये घेतले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी माझ्याशी संपर्क केला”, असेही अंजली दमानियांनी म्हटले.

ताज्या बातम्या

AMC Election : शिवसेनेचा गड की भाजप-राष्ट्रवादीची मुसंडी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगरच्या मध्यवर्ती शहराचा भाग हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात शिवसेनेला सोबत घेऊनच यापूर्वी भाजपला काही प्रमाणात यश मिळाले होते....