Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAnjali Damania : “वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक? गंभीर गुन्हे दाखल होऊनही…”; अंजली...

Anjali Damania : “वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक? गंभीर गुन्हे दाखल होऊनही…”; अंजली दमानियांकडून पुन्हा प्रश्नांची सरबत्ती

मुंबई । Mumbai

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या (Santosh Deshmukh Murder Case) सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

आज वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. याच दरम्यान वाल्मिक कराडवरुन पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराडला सरकारी अंगरक्षक होता का? असाही प्रश्न अंजली दमानियांनी विचारला आहे.

अंजली दमानियांनी काय प्रश्न उपस्थित केले आहेत?

या वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक होता?

कोणामुळे दिला गेला अंगरक्षक ?

अशा माणसांची सुरक्षा आमच्या कराच्या पैशातून होणार ?

हा माणूस मुख्यमंत्री लाडकी योजनेचा अध्यक्ष ? कोणी केला ह्यांना अध्यक्ष ?

धनंजय मुंडे यांच्या आशिर्वादाने ना ? मग कधी राजीनामा घेणार त्यांचा ?

असे अनेक गंभीर FIR पण कारवाई केली गेली नाही ? का ?

असे प्रश्न अंजली दमानियांनी उपस्थित केले आहेत. एक्स या सोशल मीडिया साईटवर त्यांनी ही पोस्ट केली आहे.

तसेच, वाल्मिक कराड यांच्यावर एक नाही एकूण 14 एफआयआर आहे. 14 पैकी दहा परळीमध्ये दाखल आहे. त्यात 3 जुलैचा एफआयआर मध्ये कलम 360 म्हणजे जीवे मारण्याची धमकी देणे, 323 म्हणजे कोणाला दुखापत पोचवणे, 326 म्हणजे धोकादायक शस्त्रांचा वापर करणे, 504 म्हणजे क्रिमिनलेशन असे गंभीर गुन्हे होते. त्यानंतरही त्याला शासकीय बॉडीगार्ड कसा दिला गेला? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

वाल्मिक कराडांवर मकोका दाखल करण्यात आल्यानंतर त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. यानंतर परळीत मात्र आंदोलन सुरू झालेलं पाहण्यास मिळालं. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या ठिय्या आंदोलनात सहभागी होत्या. यावेळी त्याच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना, कराडवरील आरोप फेटाळून लावले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या