मुंबई | Mumbai
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे (Minister Dhananjay Munde) निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे नाव आल्याने मुंडे चांगलेच गोत्यात आले आहेत. अशातच आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना झालेल्या भ्रष्टाचाराची (Corruption) पुराव्यानिशी माहिती देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
यावेळी बोलतांना दमानिया म्हणाल्या की, “महायुती सरकारच्या (Mahayuti Government) मागील काळात धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना त्यांच्या विभागात नॅनो डीएपी, नॅनो युरियाचा तब्बल ८८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. केंद्र सरकारने (Central Government) २०१६ साली शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या (DBT) माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते. राज्य सरकारला हे आदेश बंधनकारक होते. मात्र, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कृषीखात्याने या आदेशाला बगल देत शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.
तसेच “एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे (Farmer) पैसे (Money) किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे”, असे म्हणत अंजली दमानिया यांनी थेट लाभ हस्तांतर योजनेतील (Scheme) कथित भ्रष्टाचारप्रकरणी पोलखोल केली. या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देते, त्या योजनांचा दुष्परिणाम होत असून त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो”, असा दावा करत अंजली दमानिया यांनी कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा लेखोजाखा मांडला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. यावेळी अंजली दमानिया यांनी या उत्पादनांची मूळ ऑनलाईन किंमत पत्रकारांना दाखवली आणि हे उत्पादन विकत घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी वाढीव पैसे आकारल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही उत्पादने इफको नावाच्या कंपनीचे आहेत. नॅनो एरियाचा १८४ पर लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ९२ रुपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढले गेले. ती २२० रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या”, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
तसेच “नॅनो डीएपीची किंमत ५२२ रुपये एक लिटर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरची बॉटल ही केवळ २६९ रुपयाला मिळते. एकूण बॉटल घेतल्या १९ लाख ५७ हजार ४३८ घेतल्या. त्याचा बाजार भाव २६९ रुपये, पण कृषी मंत्र्यांनी ५९० रुपयाला खरेदी केली आहे. हे दोन्ही घोटाळे ८८ कोटींचे आहेत. बॅटरी स्पेअर हा टु इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो. तो २४५० रुपयाला मिळतो. एमएआयडीच्या (MAID) वेबसाईटवर २९४६ रुपयाला विकला जातो. कृषी मंत्र्यांनी टेंडर काढले. ३४२६ रुपयाला त्यांनी ही बॅटरी विकत घेतली. एक हजाराच्या वर एक एक बॅटरी स्पेअर कमावले. तर डीबीटी योजनेत ५ लाखांहून अधिक लाभार्थी होणार होते. यासाठी बजेट ठरलं होतं. पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला”, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.