Monday, May 20, 2024
Homeजळगावदेशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत विद्यापीठाच्या संगीत विभागाची अंजली मोरे प्रथम

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत विद्यापीठाच्या संगीत विभागाची अंजली मोरे प्रथम

जळगाव jalgaon प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) विद्यार्थी विकास विभाग (Department of Student Development) आणि भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्यावतीने (School of Language Studies and Research Centre) घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गीत गायन (patriotic song singing competition) स्पर्धेत विद्यापीठाच्या संगीत विभागाची (Music Department) विद्यार्थिनी अंजली मोरे (Anjali More) हिने प्रथम क्रमांक (First) प्राप्त केला.      

- Advertisement -

   देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जामनेर महाविद्यालयाचा याने व्दितीय तर भौतिकशास्त्र प्रशाळेची दर्शना साठे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.  व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. 

यावेळी प्रा.संजय पत्की, प्रभारी संचालक प्रा.सुनील कुलकर्णी, प्रशाळेच्या संचालक प्रा.मुक्ता महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

  देशभक्तीचा भाव हा जसा गीत आणि संगीतातून व्यक्त होतो तसा देशाच्या प्रगती व विकासासाठी आपण आपल्या प्रयत्नातून करायला हवा.  देशभक्ती केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नको असे दिलीप पाटील म्हणाले. 

प्रा.मुक्ता महाजन यांनी संगीतातील सूर आणि समाजातील असूर याचा फरक सांगितला. 

प्रा. अलका चव्हाण व प्रिया महाले यांनी परीक्षक म्हणून काम केले.  डॉ.पुरुषोत्तम पाटील यांनी सूत्रसंचालन केले.  योगेश शिंदे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या