पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
शेतीमालाचे भाव हे उत्पादन खर्चावर असले पाहिजेत असं समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या दरात वाढ केली आहे, 1580 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव दिला जाणार आहे. मात्र तरीदेखील शेतकर्यांना कांद्याचा उत्पादन खर्च मिळणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यावर हजारे यांनी प्रतिक्रिया दिली.
- Advertisement -
ते म्हणाले, शेतीप्रधान भारत देशात शेतकर्यांची जी अवस्था आहे ती दुर्दैवी आहे, एकीकडे कृषीप्रधान भारत देश म्हणतो आणि दुसरीकडे शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव नाही. शेतकरी जेवढा खर्च करतो त्यात भर घालून शेतकर्यांना उत्पन्न मिळाले पाहिजे, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.




