Wednesday, December 4, 2024
Homeनाशिक'लाडकी बहीण'साठी २१०० रुपये देणार; मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून महायुतीच्या १० कलमांची घोषणा

‘लाडकी बहीण’साठी २१०० रुपये देणार; मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून महायुतीच्या १० कलमांची घोषणा

कोल्हापूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचारास प्रारंभ केला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत त्यात लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आल आहे.

जाहीरनाम्यातील १० महत्वाच्या घोषणा

- Advertisement -

१) लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे आश्वासन. ,महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांचा पोलीस दलात समावेश करणार

२) वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन

३) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.१५००० प्रत्येक वर्षाला रु.१२००० वरुन रु.१५०००देण्याचे तसेच MSP वर २०% अनुदान देण्याचे आश्वासन

४) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा

५) २५ लाख रोजगार निमिर्ती, १० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून रु.१०,००० विद्यावेतन देणार

६) वृद्ध पेन्शन धारकांना रु.२१०० महिन्याला – रु.१५०० वरुन रु.२१०० देणार

७) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार

८) ४५,००० गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधणार

९) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.१५,००० आणि सुरक्षा कवच

१०) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@२०२९‘ १०० दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या