Friday, May 3, 2024
Homeक्रीडाश्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

सलिल परांजपे, नाशिक

मुंबई | Mumbai

- Advertisement -

जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघातील स्टार खेळाडू ४ महिन्यांकरिता इंग्लंड दौऱ्यावर आहेत. संघासोबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मार्गदर्शनासाठी असणार आहेत…

त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार? आणि संघाचे प्रशिक्षक कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

गुरुवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. तर संघाचे उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारकडे सोपवण्यात आले आहे. संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड असणार आहेत.

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या खेळाडूंना आता भारतीय संघात संधी मिळाली आहे.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपली कामगिरी उंचावण्यासाठी सज्ज आहे. ईशान किशन, वरुण चक्रवर्ती, देवदूत पडिकल, ऋतुराज गायकवाड, कृष्णप्पा गौतम या नव्या चेहऱ्यांना संघात स्थान मिळाले आहे.

यांना मिळाले स्थान

शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदूत पडिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, ईशान किशन, संजू सॅमसन, के गौतम, राहुल चाहर, कुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, चेतन सकारिया, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी.

- Advertisment -

ताज्या बातम्या