दिल्ली | वृत्तसंस्था
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी २५ जानेवारी २०२५ ‘पद्म पुरस्कार -२०२५’ ची घोषणा केली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिला जातो -१) पद्मविभूषण, २)पद्मभूषण आणि ३)पद्मश्री.
यामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना तिघांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
१)नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे – पद्मश्री पुरस्कार,
२) प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली- पद्मश्री पुरस्कार,
३) वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल – चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा