Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedजळगाव : जिल्ह्यात आणखी दहा करोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव : जिल्ह्यात आणखी दहा करोना बाधित रूग्ण आढळले

बाधित रूग्णांची संख्या झाली 124

जळगाव –

जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये भुसावळ येथील पाच, चोपडा येथील दोन, अमळनेर येथील एक तर मेहरूण व ममुराबाद (जळगाव ) येथील दोन रूग्ण असे एकूण दहा रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 124 इतकी झाली असून त्यापैकी सोळा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Amol Kolhe : खासदार डॉ. अमोल कोल्हेंचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले,...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी काल (बुधवारी) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)...