Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशअरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, मान्सूनवर परिणाम होणार?

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, मान्सूनवर परिणाम होणार?

मुंबई | Mumbai

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

- Advertisement -

संभावित चक्रीवादळामुळे कोकणसह महाराष्ट्र आणि गुजरातला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता हवामान खात्याने मच्छिमारांना मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे. यंदाच्या हंगामातील मान्सून मालदीवसह दक्षिण भारत आणि श्रीलंकेत दाखल झाला आहे. त्यानंतर आता अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघातानंतर घटनास्थळी परिस्थिती काय? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

आज (५ जून २०२३) अरबी समुद्रात चक्रीवादळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून पुढील ४८ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच याचा अचूक अंदाज येण्यासाठी आणखी तासभर जावे लागणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

जर चक्रीवादळ तयार झाल्यास पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेच्या दिशेने सरकेल. परिणामी चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर वारे वेगाने वाहतील. वादळामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पाऊस पडेल आणि मान्सूनची प्रगती अधिक वेगाने होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Biggest Train Accidents In India : भारतातील भीषण रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले… वाचा, कधी अन् कुठे झालेत अपघात?

दरम्यान, आज मराठवाड्यामध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर मुंबई आणि विदर्भामध्ये उष्णता जाणवण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

चक्रीवादळांची निर्मिती कशी होते?

चक्रीवादळ हे अत्यंत कमी दाब असलेले क्षेत्र असते. यामध्ये वादळाच्या केंद्रातून दाब वाढत जातो. दबावाचे प्रमाण त्याच्या केंद्रामध्ये कमी कमी होत जाते व बाहेरील वादळाची तीव्रता व हवेचा वेग अधिक वाढत जातो. याचा वेग व शक्ती इतकी असते की, घराच्या भिंतीही ढासळून जातात. रस्त्यावर उभी असलेली कारसारखी वाहने हवेत उडतात. एक पूर्ण विकसित चक्रीवादळ १५० ते १००० कि. मी. एवढ्या अंतराचा टप्पा पार केल्यानंतर १० ते १५ कि. मी. एवढी त्याची उंची वाढते. त्याच्या या विक्राळ रूपात ते आपल्या रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व नष्ट करत चालते.

Train Accident : ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात! २३८ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी

या चक्रीवादळाचा सर्वात शांत भाग त्याच्या नेत्राला मानले जाते. या नेत्राचा व्यास ३० ते ५० कि.मी.पर्यंत असू शकतो. या क्षेत्रामध्ये ढगांसह हलक्या स्वरूपाची हवा असते. या स्वच्छ व शांत नेत्राच्या चारही बाजूंनी वादळी ढगांच्या भिंती असतात. यामध्ये वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कडाडणे आदी विध्वंसक गोष्टींचा समावेश असतो. चक्रीवादळाच्या नेत्रापासून वादळी ढग व हवेची भिंत दूरवर पसरत गेल्यास हवेचा वेग कमी कमी होत जातो.

मात्र, काही मोठ्या चक्रीवादळांमध्ये नेत्रापासून ६०० कि.मी.पेक्षाही अधिक दूरवर हा हवेचा वेग ५० ते ६० कि.मी. प्रतितास एवढा असतो. हे चक्रीवादळ एका दिवसामध्ये ३०० ते ५०० कि. मी. अंतराचा टप्पा आपल्या वेगाने गाठते. यामुळेच असे वादळ आपल्यामागे सर्व गोष्टी सपाट करून मृत्यूच्या राशी उभ्या करून जाते. चक्रीवादळ आपल्याकडे नेहमी येत असल्याचे दिसते; मात्र त्यांची तीव्रता कमी-जास्त असते. काही वादळांचा वेग, शक्ती व विशालता खूप मोठी असल्याने त्यांना काही विशिष्ट नावेदेखील पडलेली आहेत.

Odisha Train Accident : माणुसकी अजूनही जिवंत आहे! रेल्वे अपघातातील जखमींच्या मदतीसाठी हजारो रक्तदात्यांची रुग्णालयांमध्ये गर्दी

- Advertisment -

ताज्या बातम्या