Sunday, May 5, 2024
Homeनाशिकआपत्तीच्या वेळी आता ‘आपदा मित्र’ करणार मदत

आपत्तीच्या वेळी आता ‘आपदा मित्र’ करणार मदत

नाशिक | Nashik

केंद्र शासनाच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद मिळण्यासाठी राष्ट्रीय सेवा याेजनेच्या (रासेयो) स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. पुणे विद्यापीठाच्या रासेयाे विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांकडून याबद्दल माहिती मागविली अाहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातील स्वयंसेवक यात सहभागी होणार आहेत. यामध्ये पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून प्रत्येकी ५० याप्रमाणे १५० रासेयो स्वयंसेवक सहभागी होणार असून प्रशिक्षणाकरिता महाविद्यालयातून दोन रासेयो स्वयंसेवकाची निवड हाेईल. स्वयंसेवकांची निवड करताना स्वयंसेवकाने राष्ट्रीय सेवा योजनेचे एक वर्ष पूर्ण केलेले असावे, स्वयंसेवक शाररिक दृष्ट्या सक्षम असावा, आपत्ती व्यवस्थापनात काम करण्याची इच्छा असावी, तसेच प्रशिक्षण ऑनलाइन असल्याने त्यांच्याकडे ऑनलाईन इंटरनेट कनेक्शनसह उत्तम दर्जाचा लॅपटॉप अथवा अँड्रॉइड मोबाईल फोन ज्यास चांगले नेटवर्क/ रेंज आवश्यक आहे.

रासेयाे स्वयंसेवकांचा हाेणार गाैरव

राष्ट्रीय सेवा योजना सन २०१९-२० च्या राष्ट्रीय सेवा योजनेंतंर्गत जिल्हा, विद्यापीठ व राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागविले आहे.

निवड हाेणाऱ्या महाविद्यालय(एकक), कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रासेयो कडूनही जिल्हा व विद्यापीठ पातळीवर हे पुरस्कार दिले जाणार असून २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये व मागील तीन वर्षामध्ये ज्या महाविद्यालये/कार्यक्रम अधिकारी/स्वयंसेवकांनी योजनेत उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.

प्रत्येक महाविद्यालयाने रासेयो कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. स्वयंसेवक पुरस्काराची छाननी करताना सर्वप्रथम महाविद्यालय स्तर, त्यानंतर जिल्हास्त व विद्यापीठ स्तरावर छाननी करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या