शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
सेवा सोसायटी मतदार संघात ९११ मतदान पैकी ८८९ मतदान झाले आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघात ८६९ मतदारांपैकी ८४४ जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
व्यापारी मतदारसंघ : १८६ पैकी १८३ मतदान.
हमाल मापाडी मतदारसंघ : २२१ पैकी २२१ मतदान. हमाल मापाडी मतदारसंघातून शंभर टक्के मतदान झाले आहे.
एकूण २१८७ पैकी २१३७ मतदान झाले आहे.
एकूण टक्केवारी : ९७.७१
राहाता | तालुका प्रतिनिधी
राहाता बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया वेगाने सुरु आहे. दुपारी 3 पर्यंत सरासरी 97.50 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला…
ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीचे संचालक या निवडणुकीसाठी मतदार आहेत. सकाळी 8 वाजेपासून राहाता शहरातील चितळी रोडलगत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया सुरु झाली. सोसायटीच्या मतदारांना 11 फुल्या माराव्या लागत असल्याने सोसायटी मतदान केंद्रावर मोठी रांग होती.
ग्रामपंचायतीलला चारच मते द्यायची असल्याने गर्दी काहीशी कमी होती. पहिल्या 7 तासात सोसायटी मतदार संघात 3 वाजेपर्यंत 906 पैकी 881 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 97.24 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
ग्रामपंचायत मतदार संघात 619 पैकी 605 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 97.73 टक्के मतदानाचा हक्क बजावला, असे सरासरी या मतदार संघात 97.50 टक्के मतदान झाले होते.
मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर काम पाहात आहेत. पोलीस यंत्रणेसह 85 कर्मचारी मतदान प्रक्रियेत आहेत.
मतमोजणी 5 वाजेनंतर चितळी रोडलगत असलेल्या घोलप मंगल कार्यालयात होणार आहे.
अकोले | प्रतिनिधी
अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी येथील कन्या विद्या मंदिर येथे सुरू असलेल्या मतदान केंद्रावर दुपारी पावणे तीन वाजेपर्यंत सुमारे 93 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे….
माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित शेतकरी विकास मंडळ व महाविकास आघाडी तसेच अन्य पक्षांचे शेतकरी समृद्धी मंडळात सरळ लढत होत आहे. शेतकरी विकास मंडळाने तीन जागां बिनविरोध करत आपले खाते खोलले आहे.
त्यामुळे शेतकरी विकास मंडळाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने आजी- माजी आमदारांसह दोन्हीही मंडळाच्या प्रमुख धुरीणांनी तालुका पिंजून काढला.
या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांत प्रचार सभांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.यानिमित्ताने दोन्हीही बाजूने व्यक्तिगत निंदा नालस्ती करण्यात आली. आजी -माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.आज सकाळी मतदान सुरू झाल्यापासून आजी माजी आमदार व त्यांचे समर्थक,प्रमुख नेते, कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून आहेत.
दोन्हीही मंडळाचे उमेदवार समोरासमोर उभे राहून मतदार राजाला मतदानासाठी साकडे घालत आहे.दोन्हीही मंडळात जोरदार चुरस या निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळत आहे.दोन्हीही मंडळांकडून मतदारांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामुळे या परिसरात सुमारे एक किलो मीटर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या दिसत आहेत. दोन्हीही मंडळांकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहे. शहरातील कन्या विद्या मंदिर परिसरात मतदार व कार्यकर्ते यांची भाऊगर्दी दिसत आहे. यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी या मतदान केंद्र व बाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे.
व्यापारी मतदार संघ :- एकूण मतदान 205 त्यापैकी 170 मतदान झाले.
ग्रामपंचायत मतदार संघ:- एकूण मतदान 1185 पैकी 1033 मतदान पार पडले.
सोसायटी मतदार संघात :- एकूण मतदान 1027 असून त्यापैकी 959 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी पावणे तीन वाजे पर्यंत एकूण टक्केवारी 93 टक्के मतदान झाले आहे.
राहाता बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया वेगाने सुरु आहे. दुपारी 1 पर्यंत या 6 तासात सरासरी 95.25 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीचे संचालक मतदार या निवडणुकीसाठी मतदार आहेत. सकाळी 8 वाजेपासून राहाता शहरातील चितळी रोड लगत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया सुरु झाली. सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. सोसायटी च्या मतदारांना 11 फुल्या माराव्या लागत असल्याने सोसायटी मतदान केंद्रा वर मोठी रांग होती. ग्रामपंचायत ला चारच मते द्यावी असल्याने गर्दी काहीशी कमी होती. पहिल्या 6 तासात सोसायटी मतदार संघात 2 वाजेपर्यंत 906 पैकी 861 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 95.03 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदार संघात 619 पैकी 591 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 95.47 टक्के मतदानाचा हक्क बजावला. असे सरासरी या मतदार संघात 95. 25 टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर काम पाहात आहेत. पोलीस यंत्रनेसह 85 कर्मचारी मतदान प्रक्रियेत आहेत. मतमोजणी 5 वाजेनंतर चितळी रोडलगत असलेल्या घोलप मंगल कार्यालयात होणार आहे. राहाता बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया वेगाने सुरु आहे. दुपारी 1 पर्यंत या 5 तासात सरासरी 90.5% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीचे संचालक मतदार या निवडणुकीसाठी मतदार आहेत. सकाळी 8 वाजेपासून राहाता शहरातील चितळी रोड लगत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया सुरु झाली. सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. सोसायटीच्या मतदारांना 11 फुल्या माराव्या लागत असल्याने सोसायटी मतदान केंद्रावर मोठी रांग होती. ग्रामपंचायतला चार मतदान असल्याने गर्दी काहीशी कमी होती. पहिल्या तीन तासात सोसायटी मतदार संघात 1 वाजेपर्यंत 906 पैकी 816 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 90 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदार संघात 619 पैकी 563 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 90.95 टक्के मतदानाचा हक्क बजावला. असे सरासरी या मतदार संघात 90.5 टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर काम पाहात आहेत. पोलीस यंत्रनेसह 85 कर्मचारी मतदान प्रक्रियेत आहेत.
राहाता बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया वेगाने सुरु आहे. दुपारी 12 पर्यंत या 4 तासात सरासरी 74 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी चे संचालक मतदार या निवडणुकीसाठी मतदार आहेत. सकाळी 8 वाजेपासून राहाता शहरातील चितळी रोडलगत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया सुरु झाली.
सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. सोसायटी च्या मतदारांना 11 फुल्या माराव्या लागत असल्याने सोसायटी मतदान केंद्रावर मोठी रांग होती. ग्रामपंचायतला चार मतदान असल्याने गर्दी काहीशी कमी होती. पहिल्या तीन तासात सोसायटी मतदारसंघात 12 वाजेपर्यंत 906 पैकी 680 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 75.01टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
ग्रामपंचायत मतदार संघात 619 पैकी 452 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 73.02 टक्के मतदानाचा हक्क बजावला. असे सरासरी या मतदार संघात 74 टक्के मतदान झाले होते.
मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर काम पाहात आहेत. पोलीस यंत्रनेसह 85 कर्मचारी मतदान प्रक्रियेत आहेत.
आज मनमाड बाजार समितीच्या 18 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे, राष्ट्रवादीचे माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. निवडणुकीत माघारीच्या दिवशी शिंदे, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये मोठा राडा झाला होता. त्यामुळे आज कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटांनी मतदारांना बाहेर गावी नेले होते. त्यांना मतदान करण्यासाठी खासगी बसेसमधून मतदानस्थळी आणण्यात आले आहे. सिन्नर बाजार समितीसाठी सोसायटी गटातून १२६० तर ग्रामपंचायत गटातून १०४९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९८.१८ टक्के मतदान झाले आहे.नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण मतदान 1) सोसायटी मतदार संघ :- ६१४ २) ग्रामपंचायत गट ५६६ 2) व्यापारी मतदार संघ :- ३५० 4) हमाल तोलारी मतदारसंघ १११. एकूण मतदान : १६४१ मतदानाची टक्केवारी ९८.४९ टक्के.येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेले एकूण मतदान १) सोसायटी मतदार संघ : १०४८ पैकी १०३६ २) ग्रामपंचायत मतदार संघ : ८३४ पैकी ८३२ ३) व्यापारी व आडते मतदार संघ : ४२३ पैकी ४०२ ४) हमाल व तोलारी मतदारसंघ : ३५३ पैकी ३४७ एकूण झालेले मतदान : २६५८ पैकी २६१७ झालेल्या मतदानाची टक्केवारी : ९८.४५ टक्केदिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : दुपारी 04 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान – 1) सोसायटी मतदार संघ :- 693 2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 1092 3) व्यापारी मतदार संघ :-426 4) हमाल तोलारी मतदारसंघ :-48 एकूण झालेले मतदान :-2259 झालेल्या मतदानाची टक्केवारी 96.95 टक्केनाशिक कृषी उत्पन्न समितीच्या निवडणूकीसाठी पेठ तालुक्यातून ग्राम पंचायत व सोसायटी गटासाठीच्या दोन जागासाठी चुरस असून ७४७ मतदार असून ४ वाजेपर्यंत जोगमोडी केंद्रावर १७० पैकी १६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर पेठ येथील केंद्र क्र. १ वर १२५ पैकी १२४ मतदारांनी हक्क बजावला. एक मतदार निधन पावल्याने १०० टक्के मतदान झाले नाही तर केंद क्रमांक २ वर ४५२ पैकी ४१७ मतदारांनी हक्क बजावल्याने एकूण सरासरी ९४.३१ टक्के मतदानाची सरासरी गाठली. मतदान शांततेत पार पडले.देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : एकूण मतदान 1) सोसायटी मतदार संघ :- 510 पैकी 500, ९८ टक्के 2) व्यापारी मतदार संघ :- 437 पैकी 423, ९६.७९ टक्के 4) हमाल तोलारी मतदारसंघ :- 96 पैकी 94, 97.91 टक्के. एकूण मतदान टक्केवारी 97.50 टक्के.
जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या बाजार समित्यांबरोबरच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव या बाजारसमित्यांसाठी मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. आज एकूण पाच बाजारसमित्यांची मतमोजणी सुरु होणार आहे. यात सिन्नर, दिंडोरी, कळवण, देवळा व घोटीतून कोणाच्या अंगावर गुलाल पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जस जसे निकाल हाती येतील तस तसे कोणाच्या पॅनलला एक हाती सत्ता मिळते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
सिन्नरला आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे कोण बाजी मारणार? दिंडोरीत दत्तात्रय पाटील आपली सत्ता राखणार का? घोटीत संदीप गुळवे व गोरख बोडके हे तीन पॅनलमध्ये झालेल्या लढतीत आपली सत्ता कायम ठेवणार का? बिनविरोधसाठी आटोकाट प्रयत्न झालेल्या देवळा बाजार समितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे वर्चस्व अबाधित राहणार का? कळवण बाजार समितीत आमदार नितीन पवार यांच्या समोर मविप्र संचालक रवींद्र देवरे यांनी आव्हान उभे केल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे या पाच ही बाजार समित्यांच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती दुपारी 03 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान : 1) सोसायटी मतदार संघ :- 681 2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 1072 3) व्यापारी मतदार संघ :-392 4) हमाल तोलारी मतदारसंघ :-48 एकूण झालेले मतदान :-2193 मतदानाची टक्केवारी 94.12नाशिक बाजार समितीसाठी पाथर्डी केंद्रावर तब्बल १०० टक्के मतदान झाले आहे. सोसायटी गटासाठी १७७ तर ग्रामपंचायत गटासाठी १२५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यातील केंद्रांवरदेखील १०० टक्के मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यात आमदार हिरामण खोसकर व काँग्रेसचे नेते संपतराव सकाळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्र्यंबकेश्वर मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
लासलगाव बाजार समितीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत २२९३ पैकी १४१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंत ६१.७५ टक्के मतदान झाले आहे. हमाल/मापारी गटातून ३९७ पैकी ३९३ मतदारांनी मतदान केले. तर निफाडला ग्रामपंचायत गटात पहिल्या दोन तासात २६१ पैकी केवळ दोन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.सिन्नर बाजार समितीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण 74 टक्के मतदान झाले आहे. सिन्नरमध्ये २८५७ मतदारांपैकी २१११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दुपारी 02 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान 1) सोसायटी मतदार संघ :- 622 2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 966 3) व्यापारी मतदार संघ :-349 4) हमाल तोलारी मतदारसंघ :- 47 एकूण झालेले मतदान :-1984 झालेल्या मतदानाची टक्केवारी 85.15निफाड येथील वैनतेय विद्यालयात लासलगाव बाजार समितीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने मतदारांची तारांबळ उडाली.मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत संचालकांच्या 18 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजता प्रारंभ झाली आहे पालकमंत्री दादा भुसे व शिवसेना उपनेते डॉक्टर अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडी मध्ये चुरशीची लढत रंगली आहे. पालकमंत्री भुसे यांचे आपलं पॅनल तर हिरे यांचे कर्मवीर पॅनल यांच्या तर अटीतटीची लढत होत आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत एकूण 4217 पैकी 1822 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता एकूण 43. 21 टक्के मतदान 12 वाजेपर्यंत झाले आहे.पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणूकीत आज सकाळपासूनच पिंपळगाव बसवंत येथील जनता विद्यालयात मतदानासाठी मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. सकाळी अकरा वाजता गर्दी अचानक वाढली. बऱ्याच गावांच्या सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य आपला दोन-तीन दिवसांचा पंचतारांकित हाॅटेलचा दौरा आटोपून मतदान केंद्रावर हजर होताच रस्ता पुर्ण पणे वाहनांनी जाम होऊन गेला. वाहतूक एक तास ठप्प झाली होती. बारा वाजेपर्यंत जवळपास 50 टक्के मतदान झाले.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीआठी १२ वाजेपर्यंत एकूण २२९३ मतदारांपैकी ७६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ३३.२८ टक्के मतदान झाले आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सोसायटी गटातून दुपारी १२ वाजेपर्यंत ५६ टक्के मतदान झाले असून १३२२ पैकी ७४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वाधिक मतदानाची टक्केवारी पेठ येथील केंद्रावर (८८ टक्के) झाली आहे. ग्रामपंचायत गटासाठी ३७.२२ टक्के इतकेच मतदान झाले आहे. २ हजार ६६ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ७६९ सदस्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सकाळी १२ वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान 1) सोसायटी मतदार संघ : १०४८ पैकी ३०७ 2) ग्रामपंचायत मतदार संघ : ८३४ पैकी १८४ 3) व्यापारी व आडते मतदार संघ : ४२३ पैकी १३५ 4) हमाल व तोलारी मतदारसंघ : ३५३ पैकी ६८ एकूण झालेले मतदान : २६५८ पैकी ६९४ आतापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी : २६.१० टक्केनांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सकाळी 12 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान 1) सोसायटी मतदार संघ :- 300 2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 285 3) व्यापारी मतदार संघ :- 171 4) हमाल तोलारी मतदारसंघ :-98 एकूण झालेले मतदान :-854 झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी 51.26 %सिन्नरमध्ये विद्यमान आमदार अॅड. माणिकराव कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्यात कांँटे की टक्कर रंगली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 54 टक्के मतदान झाले आहे.दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती
दुपारी 12 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान
1) सोसायटी मतदार संघ :- 427
2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 529
3) व्यापारी मतदार संघ :-253
4) हमाल तोलारी मतदारसंघ :-43
एकूण झालेले मतदान :-1252
झालेल्या मतदानाची टक्केवारी 53.73त्र्यंबकेश्वर तालुक्यात आमदार हिरामण खोसकर व काँग्रेसचे नेते संपतराव सकाळे यांची प्रतिष्ठा पणालादिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान : 1) सोसायटी मतदार संघ :- 153 2) ग्रामपंचायत मतदार संघ :- 123 3) व्यापारी मतदार संघ :-112 4) हमाल तोलारी मतदारसंघ :-29 एकूण झालेले मतदान :-417 झालेल्या मतदानाची टक्केवारी 17.89पिंपळगाव बसवंत : मतदान केंद्राबाहेर पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. मतदान केंद्र नियोजित असतानाही पोलिसांनी आधीच वाहतुकीचे नियोजन केले का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामान्य नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. तीव्र उन्हाचा पारा असताना वाहनचालक व विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे पोलिसांच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.सिन्नर : पहिल्या दोन तासात तालुक्यात 22 टक्के मतदानकळवणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार व माजी आमदार जे. पी. गावित या दोघांच्या पॅनलमध्येच चुरशीची लढत होत आहे.सिन्नरमध्ये विद्यमान आमदार अॅड. माणिकराव कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्यात कांँटे की टक्कर रंगली आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत माजी आमदार अनिल कदम, पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्करराव बनकर, युवा नेते गोकुळ गिते यांनी आमदार दिलीप बनकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केल्याने व होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींंमुळे या निवडणुकीकडे आगामी विधानसभा निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून पाहिले जात आहे. दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे फोटो दोन्ही गटाच्या पॅनलच्या पोस्टरवर झळकत असल्याने ही निवडणूक चर्चेत आली आहे. येथे कोणत्याही एका पक्षाच्या नावाखाली निवडणूक होत नसून दोन्हीही गटाच्या पॅनलमध्ये सर्वपक्षीय उमेदवार आहेत. त्यामुळे येथे राजकीय पक्षाचे नेतृत्व करणार्या नेतृत्वाचीही राजकीय अडचण होऊन बसली आहे.लासलगाव, येवला बाजार समितीत माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.भुसे-हिरे गटात कांँटे की टक्कर : मालेगाव बाजार समितीच्या प्रचारात विद्यमान पालकमंत्री दादा भुसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांच्यामध्ये आरोपांचा कलगीतुरा रंगला आहे. ताज्या अपडेट्ससाठी ही लिंक रिफ्रेश करा…
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या बाजार समित्यांबरोबरच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, मनमाड व सुरगाणा अशा 14 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत ग्रामपंचायत मतदार संघात ८% तर सहकारी संस्था मतदार संघात २१% मतदान झाले आहे…
सुरगाणा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 13 पैकी 12 बाजार समित्यांसाठी आज मतदान होत असून रविवारी (दि. 30) मनमाड बाजार समितीसाठी मतदान होणार आहे. 13 बाजार समित्यांच्या 223 जागांसाठी 537 उमेदवार रिंगणात आहे. 29 जागांवरील निवडणूक (Election) ही बिनविरोध पार पडली आहे.
दरम्यान, बाजार समित्यांच्या निवडणुकीकडे आगामी लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे ही निवडणूक अंतिम टप्प्यात अस्तित्व आणि प्रतिष्ठेची झाल्याने मतदारांची पळवापळवी,विविध आमिषे दाखवत साम- दाम- दंड याचा पुरेपूरवापर झाल्याचे दिसून आले. अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा ज्वर चढत जाऊन आरोप-प्रत्यारोपांनी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.