Monday, August 17, 2026
HomeनगरCrime News : अरणगावला पोटच्या मुलाने केली बापाची हत्या

Crime News : अरणगावला पोटच्या मुलाने केली बापाची हत्या

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यातील अरणगाव येथे मुलानेच बापाची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. शेजार्‍यांना शिवीगाळ करु नको असे सांगितल्याने वडिलांनी मुलाला कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलाने बापाच्या हातातील कोयता हिसकावून त्याच कोयत्याने व काठीने वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. पोटच्या मुलानेच बापाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की रविवार दि. 26 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मयत वडील रावसाहेब उर्फ (बबन) विठ्ठल सोनवणे (वय 68, रा. अरणगाव) हे शेजार्‍यांना शिवीगाळ करित होते. यावेळी मुलगा अशोक रावसाहेब सोनवणे (वय 24) याने वडीलांना शेजार्‍यांना शिविगाळ करु नका असे सांगितले. मात्र वडिलांनी आपल्या मुलालाच कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलाने वडिलांच्या हातातील कोयता हिसकावून घेऊन वडिलांना कोयता व त्या ठिकाणी असलेल्या काठीने पाठीवर व पोटावर मारहाण केली. या मारहाणीत रावसाहेब सोनवणे हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले व नंतर ग्रामीण रुग्णालयात आणले.

यावेळी तेथील डॉक्टरांनी रावसाहेब सोनवणे मयत झाले असल्याचे सांगितले. घटना घडली त्या दिवशी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. यानंतर मयत रावसाहेब सोनवणे यांचा मुत्यु नेमका कशामुळे झाला यासाठी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सोमवार दि 27 रोजी पुणे येथील ससुन हॉस्पिटल याठिकाणी करण्यात आले. यावेळी रावसाहेब सोनवणे यांचा मुत्यू पोटात व पाठीवर झालेल्या जखमेमुळे पोटात रक्तस्त्राव होऊन झाला असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यानंतर मंगळवार दि. 28 रोजी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अशोक रावसाहेब सोनवणे याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...