अकोले |प्रतिनिधी| Akole
तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी (दि. 17) रोजी सकाळी झाला. या अपघातात लहित बुद्रुक येथील पांडुरंग रखमा चौधरी (वय 58) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. त्यांच्या दुचाकीला (क्र.एमएच.17, सीजे.6250) दूध टँकरने (एमएच.16, सीसी.1247) जोराची धडक झाली.
- Advertisement -
ही धडक इतकी भीषण होती की चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू (Death) झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या घटनेमुळे लहित बुद्रुक (Lahit Budruk) गावावर शोककळा पसरली. अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.




