Monday, May 20, 2024
Homeधुळेसरी पध्दतीने घेतले एकरी तब्बल 106 टन ऊसाचे उत्पन्न

सरी पध्दतीने घेतले एकरी तब्बल 106 टन ऊसाचे उत्पन्न

पिंपळनेर Pimpalner। वार्ताहर

पारंपारिक ऊस लागवड (Sugarcane cultivation) पद्धतीत साधारणतः 2.5 ते 3.5 फुट रुंदीची सरी घेवुन एकरी सरासरी 40 टन उत्पन्न घेतले जाते. परंतु साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथील सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर व प्रयोगशील शेतकरी (farmer) राजेंद्र शिरवाडकर यांनी चालू वर्षी 7 फूट रुंद सरी घेवुन एकरी तब्बल 106 टन ऊसाचे उत्पन्न (Sugarcane yield) घेतले आहे.

- Advertisement -

शिरवाडकर यांनी फुले 265 या वाणाची आडसाली ऊस लागवड 15 आँगस्ट 2021 रोजी केली होती. सध्या मजुरांची समस्या व वाढत्या महागाईमुळे शेती परवडत नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे गरजेचे आहे. ऊसासाठी रुंद सरी पद्धत हे आधुनिक तंत्र आहे. रुंद सरी पद्धतीत उत्पादन खर्च कमी येतो. बेणे, मजुरी व खतात बचत होते. ट्रॅक्टरने आंतरमशागत करता येते. रुंद सरीमुळे भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा व ऊसाची योग्य मशागत, देखभाल करणे सोपे होते. त्यामुळे ऊसाची भरपूर वाढ होते. फुटवा येतो व उत्पन्न वाढते. तसेच ऊस पिकात सोयाबीन, कांदा, भुईमुग आदी आंतरपिक घेऊन एकरी उत्पन्न वाढविता येते.

श्री.शिरवाडकर यांनी लागवडी पुर्व उभी व आडवी ना़ंगरटी, हिरवळीचे खत, साखर कारखान्यातील पेंट वाँश, प्रेस मडचा वापर, दोन डोळा टिपरी, रासायनिक बेणे प्रक्रीया, दोन टिपरीत 5 इंच अंतर, जीवामृत तसेच रासायनिक व जैविक खताचा संतुलित वापर व ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.

या यशासाठी द्वारकाधीश साखर कारखाना (शेवरे ता. सटाणा), येथील चेअरमन शंकरराव सावंत प्रमुख शेतकी अधिकारी विजय पगार, ऊस विकास अधिकारी कर्पे, पिंपळनेर गटाचे सुपरवायझर एन. एस.कापडणीस, भटू गांगुर्डे, सर्जेराव गांगुर्डे, जी.एस.चौरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कादवा साखर कारखाना कादवा नगर ( दिंडोरी) येथील चेअरमन श्रीराम शेटे, पुणे येथील ऊस शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी विशेष मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या