Monday, November 23, 2026
Homeदेश विदेशमतदार यादीतून कोट्यवधी नावे वगळल्याचा आरोप; महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सुप्रीम...

मतदार यादीतून कोट्यवधी नावे वगळल्याचा आरोप; महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली | New Delhi
महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (SIR) सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत दाखल झालेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.

याचिकाकर्त्यांनी मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेतील कथित त्रुटी, नावे वगळण्याची पद्धत आणि मतदारांना पुन्हा नोंदणीसाठी सांगितल्या जाणाऱ्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या याचिकेमुळे महाराष्ट्रातील मतदार यादीच्या पुनरीक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

- Advertisement -

नेमका काय आहे याचिकाकर्त्यांचा दावा?
याचिकाकर्ते अरुण आनंदगिरी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. महाराष्ट्रातील मतदार यादीच्या पुनरीक्षणादरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली गेल्याचा दावा त्यांनी केला.

मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सुमारे ४० टक्के मतदारांची नावे यादीत उरलेली नाहीत, असा धक्कादायक दावा वकिलांनी कोर्टासमोर केला. ज्या नागरिकांची नावे परस्पर मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांना पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी ‘फॉर्म क्रमांक ६’ भरण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

The Supreme Court has refused to extend the date for filing of documents including claims and objections for persons wanting to be included in the voter rolls in Maharashtra under the Election Commissions’ (ECI) special intensive revision (SIR) exercise in the State.

A bench of CJI Surya Kant, Justices Joymalya Bagchi and V. Mohana has however issued notice to the ECI seeking response on a plea filed by petitioner Arun Anandagiri alleging that 33% voters have been deleted from the voter rolls in the State under the ECI’s SIR exercise.

Senior Advocate Arvind Datar appearing for the petitioner, informed the bench that around 3,500 redevelopment projects are underway in Bombay and Pune, with old housing colonies being demolished, leading to the relocation of thousands of people whose names are at the risk of being deleted owing to missing address and other details. The senior counsel also sought a direction that a fresh From is needed to be brought in by the ECI for persons whose names have already been in the voter lists during earlier elections. Asking existing voters to fill Form 6 is incorrect, Form 6 is meant for registration of new voters, not for voters who are already enrolled, Datar submitted. The counsel
sought that a deadline for filing claims and objections to be inducted in the rolls which is today, be extended so that people have more time to do the same and also sought that finalisation of the voter list be stayed until the Court hears the matter.

The Court however refused to grant any extention today but assured the counsel that it will hear the case soon and if it seems to it that an extention is needed, it will issue directions accordingly.

“Don’t worry. You are a whistle blower. You have come to us. Don’t worry. We can always extent the date. If we find that there are people who are yet to file their documents, we will. We have been extending dates in earlier (SIR) matters also”, the CJI said.

The Court will hear the case on November 5.— ANI (@ANI) October 26, 2026

याचिकाकर्त्यांनी दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत वाढवण्याची तसेच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाची बाजू ऐकून घेण्यापूर्वी मुदतवाढ देण्यास किंवा अंतिम यादीच्या प्रसिद्धीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ नकार दिला. न्यायालयाने या टप्प्यावर याचिकेवर नोटीस जारी केली आहे; मात्र याचिकाकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या नाहीत. पुढील सुनावणीत संबंधित यंत्रणांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालय पुढील निर्देश देऊ शकते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कारखानदारांऐवजी बळीराजाच्या मुलांना बिनव्याजी कर्ज द्या!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे. त्यामुळे या बँकेने साखर कारखानदारांना कोट्यवधी रूपयांचे कर्ज देण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध...