Thursday, April 16, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : खरात-पोफळेचे सोलापूर कनेक्शन; अकरा एकर जमिनीचा खरेदी दस्त...

Ashok Kharat Crime : खरात-पोफळेचे सोलापूर कनेक्शन; अकरा एकर जमिनीचा खरेदी दस्त उघड, पत्नीच्या नावे कोट्यवधींची माया?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यासह सहकार क्षेत्राला हादरवून सोडणान्या खरात प्रकरणात (Kharat Case) आता नवनवीन खुलासे होत असताना, संशयित आणि पुण्यातील (Pune) तत्कालीन सीए ललित पोफळे याच्या संपत्तीचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. खरात सध्या गजाआड असला तरी, त्याचा उजवा हात मानला जाणारा पोफळे अद्याप रान मोकळे असल्यासारखा वावरत असल्याचा आरोप सामाजिक संघटना करत आहेत. त्यातच, सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथे पोफळे याने शक्तीपीठ महामार्गालगत तब्बल ११ एकर (४.४९०० हेक्टर) जमीन खरेदी केल्याचे अधिकृत दस्तऐवज समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, ललित पोफळे याने बहुतांश आर्थिक व्यवहार स्वतःच्या नावाऐवजी पत्नी मोनिका ललित पोफळे यांच्या नावे केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे, पडसाळी येथील गट नं. ४०५/१/अ मधील ही जमीन खरेदी करताना कोट्यवधींचा व्यवहार झाला आहे. विशेष म्हणजे, शक्तीपीठ महामार्गाचे काम प्रस्तावित असलेल्या या भागात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असतानाच ही खरेदी करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या कार्यक्रमाला IG कराळेंची उपस्थिती; अंजली दमानियांनी फोटो, Video शेअर करत केला गंभीर आरोप

पोफळेच्या विरोधात एसआयटीसह (SIT) पोलिसांकडे पुरावे साचत असतानाही त्याला अद्याप मोकळे का सोडले आहे? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात बरच्या स्तरावरून मोठे ‘लॉबिग’ सुरू असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, तपास यंत्रणा नेमकी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, पडसाळी (Padsali) येथील हा ११ एकरचा दस्त आता पोफळेच्या अडचणीत वाढ करणार, असे दिसत आहे. यासंदर्भान पोफळे याच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

‘रेंज रोव्हर’ ते ‘फाईव्ह स्टार’ची मैत्री

खराल, पोफळे आणि चाकणकर हे ‘त्रिकूट’ केवळ व्यावसायिक भागीदारीतच नव्हे, तर रुटीन लाईफमध्येही घट्ट जोडलेले होते, अशी चर्चा सुरु झाली आहे. पतसंस्थेतील ठेवीदारांचा पैसा, एकाच ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनी, आलिशान ‘रेंज रोव्हर’ कार आणि फाईव्ह स्टार हॉटेलमधील बैठका हा यांच्या जीवनशैलीचा भाग होता. खरात जेलमध्ये असताना पोफळे मात्र नाशिक पोलिसांकडे उलट ८ कोटींची फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज देऊन स्वतःला ‘बळी’ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : महिलेकडून तरुणाची हत्या; कोयत्याने केले सपासप वार

शेततळे, विहीर आणि फळबागांसह खरेदी

या दस्तात केवळ जमिनीचाच उल्लेख नसून, त्यावरील मालमत्तेचाही सविस्तर तपशील आहे. यामध्ये जांभूळ आणि कलमी आंब्याची शेकडो झाडे, १२५० चौरस फुटाचे शेत, विहिरी, मोटर पंप आणि ग्रीन शेड अशा सर्व सोयींनी युक्त ही ‘प्रॉपर्टी’ आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही गुंतवणूक खरात प्रकरणातील ‘डर्टी मनी’चा भाग तर नाही ना? असा संशय बळावू लागला आहे.

दस्तामधील तपशील

  • गावाचे नाथः पडसाळी, ता. उत्तर सोलापूर,
  • क्षेत्रफळ: ४.४९०० हेक्टर (सुमारे ११ एकर),
  • बाजारभाव / मोबदला: २ कोटी ४४ लाख ७० हजार ५०० रुपये
  • खरेदीदार मोनिका ललित पोफळे
  • मुद्रांक शुल्कः १२ लाख २३ हजार ६०० रुपये,

ताज्या बातम्या

Nashik News : डायोसेशन प्रकरणी उच्च न्यायालयाचा नाशिक पोलिसांना दणका, म्हणाले...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिकमधील बहुचर्चित 'नाशिक डायोसेशन कौन्सिल ट्रस्ट' (एनडीएसटी) (Nashik Diocesan Council Trust Case) मालकीच्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात अडथळा आणणाऱ्या नाशिक शहर...