Thursday, May 21, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : भोंदू खरातच्या कार्यक्रमाला IG कराळेंची उपस्थिती; अंजली दमानियांनी...

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या कार्यक्रमाला IG कराळेंची उपस्थिती; अंजली दमानियांनी फोटो, Video शेअर करत केला गंभीर आरोप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. राजकीय नेत्यांसोबत खरातचे फोटो समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक (IG) दत्ता कराळे (Datta Karale) यांचे अशोक खरात सोबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर आणत गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग ताब्यात

अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवर एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. यात नाशिकचे आयजी दत्ता कराळे हे अशोक खरातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहेत. या पोस्टमध्ये दमानिया म्हणाल्या आहेत की, “श्री दत्ता कराळे हे एक IG लेवलचे पोलीस अधिकारी असताना खारतांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खारतांवर विश्वास का नाही बसणार? त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे. त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल 18 कॉल आहेत. ह्याचे उत्तर पोलिस महासंचालक श्री सदानंद दाते सरांनी घेतले पाहिजे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे अशा भोंदू बाबाशी काय संबंध असू शकतात? याची तातडीने चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, अंजली दमानिया यांच्या आरोपांनंतर अद्याप आयजी दत्ता कराळे किंवा पोलीस प्रशासनाकडून (Police Administration) कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दुसरीकडे पोलीसच जर अशा भोंदूगिरीला पाठबळ देत असतील, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? असा सवाल केला जात आहे. तसेच अशोक खरात आणि आयजी दत्ता कराळे यांच्यात नेमके कोणते संबंध आहेत, याची चर्चा होत आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : महिलेकडून तरुणाची हत्या; कोयत्याने केले सपासप वार

तिसऱ्या गुन्ह्यात खरातला पाच दिवसांची कोठडी

अशोक खरातची आज (मंगळवारी) तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला व्हिडीओ कॉन्फरसद्वारे नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी हा गुन्हा वेगळ्या महिलेशी संबधित असून, अधिक तपास करायचा आहे. त्यामुळे कोठडी द्यावी अशी मागणी केली. तर खरातच्या वकिलांनी मागील दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलीसांनी असाच युक्तिवाद केला होता असे म्हणत कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद केला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खरातला १८ एप्रिलपर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बहुराष्ट्रीय कंपनी धर्मांतर प्रकरणातील संशयित एजीएम चैनानीच्या कोठडीत वाढ; ७८ संशयास्पद ईमेल SIT च्या रडारवर

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत खंदेपालट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत खंदेपालाट करण्यात आली आहे. बुधवारी (20 मे) बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यात चेअरमनपदी संगमनेरच्या संचालिका सरस्वती...