नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) दहशतीसह अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिला प्रत्यक्ष समोर येण्यास कचरत आहेत. मात्र, एसआयटीने (SIT) उपलब्ध करून दिलेल्या दोन्ही मोबाईल क्रमांकांवर तक्रारींचा ओघ सुरू झाला असून, खरातच्या पापांचा पाढा आता वाचला जात आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटी रविवारी (दि. २९) खरातला नाशिक न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला ०१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडी पुन्हा वाढवली, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती
खरातविरुद्ध आतापर्यंत बलात्काराचे (Rape) आठ आणि फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. समाजात बदनामी होईल या भीतीपोटी अनेक पीडिता पोलीस ठाण्यात येण्यास कचरत आहेत. मात्र, एसआयटीच्या दोन्ही विशेष क्रमांकांवर अनेक महिलांनी संपर्क साधून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला आहे. या कॉलद्वारे मिळणाऱ्या माहितीवरून खरातने केवळ नाशिकच नव्हे, तर बाहेरील जिल्ह्यातील महिलांचेही शोषण केल्याचे स्पष्ट होत आहे. खरातने केवळ महिलांचीच फसवणूक केली नाही, तर श्रद्धेपोटी आलेल्या भक्तांनाही लुटले आहे.
हे देखील वाचा : Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT च्या रडारवर; चौकशीसाठी बजावले समन्स
नेवासा (Newasa) येथील एका कापड व्यावसायिकाला ‘व्यवसायात वृद्धी होईल’ असे सांगून त्यांच्याकडून सोन्याच्या तीन अंगठ्या (२० ग्रॅम) आणि २ लाख ६२ हजार रुपये उकळले. त्या बदल्यात मंत्रांनी भारलेले हिरे आणि पुष्कराज खडा देण्याचे आमिष दाखवले. मात्र, खरातला अटक झाल्यावर सत्य बाहेर आले. तपासणीअंती त्या अंगठ्या सोन्याच्या नसून पिवळ्या धातूच्या (तांबे-पितळ) होत्या आणि त्यातील महागडे वाटणारे खडेही पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरातची ‘शस्त्र कुंडली’ उघड; पोलीस रेकॉर्डमधून पुरावेच गायब
खरातच्या फार्महाऊसवर (Farm House) जप्त झालेली पिस्तूल आणि २१ जिवंत काडतुसे यावरून एसआयटीला नरबळी किंवा खुनाचा दाट संशय आहे. पीडितेला गुंगीकारक पेढे आणि कडवट पाणी पाजून त्याने वारंवार अत्याचार केले. ‘मी महादेवाचा अवतार आहे’ असे सांगून त्याने पीडितेवर ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान चार वेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून खरातचा सुनील तटकरेंना फोन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप





