Sunday, June 21, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : कल्पनाची 'माया' अफाट; सात कोटींच्या व्यवहारांवर न्यायालयाचे ताशेरे

Ashok Kharat Case : कल्पनाची ‘माया’ अफाट; सात कोटींच्या व्यवहारांवर न्यायालयाचे ताशेरे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या (Fraud) आरोपाखाली अटकेत असलेला अशोक खरात याच्या गुन्ह्यात (Crime) आता त्याच्या पत्नीचा सहभाग अधिक स्पष्ट झाला आहे. गेल्या ४१ दिवसांपासून खरात पोलीस कोठडीत असताना, मालमत्तेची ४० टक्के भागीदार असलेली त्याची पत्नी कल्पना हिने पोलिसांना (Police) चकवा दिला आहे. राहाता न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आता तिच्या अटकेसाठी पोलिसांवरील दबाव वाढला आहे.

- Advertisement -

न्यायालयीन सुनावणी (Court Hearing) दरम्यान कल्पना खरात हिने आपण केवळ ‘गृहिणी’ आणि ‘व्यावसायिक’ असल्याचे सांगत या व्यवहारांशी संबंध नसल्याचा दावा केला होता. मात्र, सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यानुसार, २०१९ पासून तिच्या बँक खात्यात सुमारे ७ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. एका जमिनीच्या व्यवहारातील ५१ लाख रुपये थेट तिच्या खात्यात जमा झाले असून, दुय्यम निबंधक कार्यालयात ती स्वतः उपस्थित असल्याचे पुरावे समोर आले आहेत.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : अंगठीचा फास, धनादेशांचा तपास; भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी

एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीबाबत पत्नीला (Wife) माहिती नव्हती, हा दावा प्रथमदर्शनी न्यायालयाने अमान्य केला आहे. तपासानुसार, अशोक खरात याने जमा केलेल्या एकूण स्थावर आणि जंगम मालमत्तेपैकी ४० टक्के संपत्ती ही पत्नी कल्पनाच्या नावावर आहे. पती-पत्नीने संगनमताने हे आर्थिक साम्राज्य उभे केल्याचे तपासातून दिसत आहे. अशोक खरात याला बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात १८ तारखेला पहाटे अटक करण्यात आली. अटकेच्या (Areested) सुरुवातीच्या काळात कल्पना शहरातच होती, मात्र शिर्डी येथे गुन्हा दाखल होताच तिने पलायन केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांपुढील आव्हान

अशोक खरात ४० दिवसांपासून जेलमध्ये असताना, तपासातील महत्त्वाची कडी असलेली त्याची पत्नी महिनाभर फरार असल्याने तपासाच्या गतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मालमत्तेची मोठी वाटेकरी असलेली कल्पना पोलिसांच्या हाती लागल्यास, या साम्राज्यातील आणखी काही आर्थिक गुपिते उघड होण्याची शक्यता आहे. सध्यातरी ‘टांगती तलवार’ असलेल्या कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक रवाना आहेत. मात्र, त्यांचे हात रितेच आहे.

हे देखील वाचा : Nashik TCS Case : ‘मालेगाव पार्टी’ रडारवर; पीडितेची ओळख पुसण्याचा होता कट

मुद्दे

  • जमिनीच्या व्यवहारांमध्ये खरातसह पत्नीची प्रत्यक्ष उपस्थिती
  • सात कोटींच्या व्यवहारांचा मूळ स्रोत शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान.
  • आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज

हे देखील वाचा : Nashik TCS Case : पीडित तरुणीचे नाव बदलून ठेवलं ‘हानिया’; टीसीएस धर्मांतर प्रकरणात ‘मलेशिया’ कनेक्शन उघड

ताज्या बातम्या