Friday, July 24, 2026
HomeनाशिकNashik TCS Case : पीडित तरुणीचे नाव बदलून ठेवलं 'हानिया'; टीसीएस धर्मांतर...

Nashik TCS Case : पीडित तरुणीचे नाव बदलून ठेवलं ‘हानिया’; टीसीएस धर्मांतर प्रकरणात ‘मलेशिया’ कनेक्शन उघड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई नाका हद्दीतील (Mumbai Naka Area) टीसीएस कंपनीतील (TCS Company) एका तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्या प्रकरणात पीडित फिर्यादीचे नाव बदलून तिला थेट मलेशियात (Malaysia) पाठविण्याचा ‘मास्टर प्लॅन’ संशयितांनी आखल्याचे खळबळजनक वास्तव न्यायालयात मांडण्यात आले आहे. या हायप्रोफाइल प्रकरणात आता विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली असून, संशयित निदा एजाज खान हिच्या अटकपूर्व जामिनावर आता २ मे रोजी अंतिम निकाल दिला जाणार आहे.

- Advertisement -

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) दाखल असलेल्या या गुन्ह्यात पसार संशयित निदा एजाज खान हिने नाशिकरोड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. सोमवारी (दि.२७) झालेल्या सुनावणीत अजय मिसर यांनी तब्बल चार तास युक्तिवाद करत या प्रकरणातील गंभीर बाबी न्यायालयासमोर मांडल्या. निदा ही तीन महिन्यांची गर्भवती असली, तरी तिच्यावरील गुन्ह्याचे स्वरूप पाहता तिला अद्याप कोणतेही अंतरिम दिलासा (अटकेपासून दिलासा) देण्यात आलेला नाही.

हे देखील वाचा : Nashik Crime News : इन्स्टा-फ्रेंडली अत्याचार; ‘युनिगॅदर’ सोशल मीडिया ग्रुपच्या नावाखाली उद्योग

त्याचवेळी झालेल्या युक्तिवादातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संशयितांनी (Suspected) पीडित तरुणीचे नाव बदलून ‘हानिया’ असे केल्याचे उघड झाले असून संशयित दानिश हा आधीच विवाहित असल्याचे पीडितेला समजल्यानंतर, तिला शांत करण्यासाठी किंवा प्रकरणापासून दूर नेण्यासाठी मलेशियात पाठविण्याचे आमिष दाखविले. तसेच निदा हिला पसार असताना कोणी आर्थिक मदत केली? यामागे कोणती मोठी साखळी आहे का? याचा तपास करण्यासाठी निदाची पोलीस कोठडी (Police Custody) आवश्यक असल्याची मागणी सरकारी पक्षाने केली.

कलम २९९ चा आधार

भारतात धर्मांतराबाबत स्वतंत्र कायदा नाही, मग असा आरोप कसा लावता येईल? असा युक्तीवाद निदाचे वकील राहुल कासलीवाल यांनी केला. त्यावर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी प्रत्युत्तर दिले. जरी विशिष्ट धर्मांतर कायदा नसला तरी, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम २९९ (नवीन कायद्यानुसार तरतुदी) अन्वये कारवाई कारवाई केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले.

हे देखील वाचा : Nashik TCS Case : ‘मालेगाव पार्टी’ रडारवर; पीडितेची ओळख पुसण्याचा होता कट

दानिशचा अर्ज निकाली

संशयित दानिश शेख याने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र सुनावणीपूर्वीच ‘एसआयटी’ने त्याला अटक केल्याने त्याचा अर्ज न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव निकाली काढला आहे. तर, संशयित तौसिफ, शाहरुख आणि रझा कोठडीत असून पीडितेचे धार्मिक फोटो आणि व्हिडिओ विशिष्ट ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’वर शेअर करणाऱ्या या तिघांसह दानिश सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. दुसरीकडे कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी, आसिफ अन्सारी आणि शफी शेख हे नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : अंगठीचा फास, धनादेशांचा तपास; भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....