Tuesday, July 14, 2026
Homeक्राईमNashik Crime News : कॉर्पोरेटच्या आड 'जिहाद'; कंपनीत तरुणींचे शोषण आणि धर्मांतराचा...

Nashik Crime News : कॉर्पोरेटच्या आड ‘जिहाद’; कंपनीत तरुणींचे शोषण आणि धर्मांतराचा कट

९ गुन्हे नोंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील एका नामांकित कंपनीच्या नावाखाली चालणाऱ्या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला असून, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नोकरी करणाऱ्या आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून त्यांचे शोषण करणे, एका तरुणीवर अत्याचार करणे आणि तरुणासह अन्य एकाचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Mumbai Naka and Deolali Police Station) एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू अशोक खरातला तिसर्‍या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

मुंबईनाका हद्दीतील एका प्रसिद्ध ‘बिझनेस सेंटर’मध्ये असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयात (Office) हे सर्व प्रकार घडत होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी तातडीने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सातपैकी सहा संशयितांना बेड्या ठोकल्या असून, त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी आणि दानिश शेख अशी अटक केलेल्यांची नावे असून, निदा खान नावाच्या महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : धक्कादायक! एका नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण, मानसिक छळ; सहा जणांना अटक

नमाज पठणाची सक्ती

सातारा येथून रोजगारासाठी नाशिकमध्ये आलेल्या एका तरुणाच्या भाबड्या स्वभावाचा संशयितांनी गैरफायदा घेतला. पीडित तरुणाला त्याच्या धर्माबद्दल हीन वागणूक देऊन इस्लाम धर्माचे आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. इतकेच नव्हे तर, त्याला भगव्या कुत्र्यावर टोपी घालून नमाज पठण करण्यास भाग पाडले आणि बळजबरीने मांसाहार करायला लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार, आजच्या सुनावणीत काय घडलं?

१२ सदस्यीय ‘एसआयटी’

या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली १२ जणांचे विशेष पथक कार्यरत आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, विश्वास पाटील, सहाय्यक निरीक्षक गौतम सुखाडे, सुधीर पाटील, कल्पेश दाभाडे, जितेंद्र वाघ, उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक भाईदास माळी, किरण शेवाळे, मिताली कोळी, अंमलदार संदीप बागल यांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेऊन पीडितांना विश्वासात घेतले असून, या रॅकेटमध्ये अजून काही पीडित मुली समोर येण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती

ठळक मुद्दे

  • काही पीडितांनी या कृत्याचे मेल पुण्यातील एचआरला पाठविले
  • पीडितांना ‘यह सब चलता है’ असे म्हणत महिला एचआरचे दुर्लक्ष
  • एकूण नऊ गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात संबंधित महिला एचआखर गुन्हा
  • नऊ गुन्ह्यांमध्ये आठ महिला आणि एका पीडित पुरुषाचा समावेश
  • सर्व पीडिता १८ ते २२ हजार रुपये वेतन घेणाऱ्या उच्चशिक्षित पदवीधर
  • एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या धर्मांतराचा प्रयत्न
  • इतर सहा प्रकरणांत तरुणींशी जवळीक साधून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या.
  • हिंदू तरुणाला बळजबरीने मांसाहार करण्यास भाग पाडणे आणि धार्मिक ओळख पुसण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या जाळ्यात मुंबईचे उद्योजक; कोट्यवधींच्या मनी लाँड्रिंगचा शिर्डीतून पर्दाफाश, तेरावा गुन्हा नोंद

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नाशिकमध्ये बिश्नोई गँगचे समर्थक! एटीएसच्या कारवाईनंतर ‘टेरर टास्क’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सोशल मीडिया (Social Media) नेक्सस प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. नाशिक परिक्षेत्रातून दहशतवाद विरोधी...