नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ज्या कॉर्पोरेट क्षेत्राला प्रगती आणि आधुनिकतेचे प्रतीक मानले जाते, त्याच क्षेत्रातील एका बड्या कं पनीत माणुसकीला काळिमा फासणारा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडाळा रोडवरील (Wadala Road) एका अग्रगण्य कन्सलटन्सी कंपनीत कार्यरत धर्मांतरण तरुणींचे जाणीवपूर्वक घडवून आणणे, त्यांच्यावर बलात्कार करणे आणि विनयभंग करण्याचे एक संघटित रॅकेट पोलिसांनी उजेडात आणले आहे. एका सजग पालकांच्या पाठपुराव्यामुळे हे ‘भयानक सत्य’ समोर आले असून, आता या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : धक्कादायक! एका नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण, मानसिक छळ; सहा जणांना अटक
देवळाली कॅम्प परिसरात (Deolali Camp Area) राहणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणीने जुलै २०२२ मध्ये मोठ्या आशेने या कंपनीत नोकरी सुरू केली. सुरुवातीला ती तरुणी आधुनिक पेहराव आणि जीवनशैली जपणारी होती. मात्र, काही महिन्यांतच तिच्या वागण्यात आणि पेहरावात अनाकलनीय बदल होऊ लागले. तिने जीन्स टीशर्ट सोडून कायमस्वरूपी सलवार-कुर्ता वापरण्यास सुरुवात केली आणि चेहऱ्यावर ओढणी घेण्यास सुरुवात केली. पालकांना सुरुवातीला हा केवळ साधेपणा वाटला. मात्र, खऱ्या धोक्याची जाणीव रमजान महिन्यात झाली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : कॉर्पोरेटच्या आड ‘जिहाद’; कंपनीत तरुणींचे शोषण आणि धर्मांतराचा कट
या तरुणीने ‘रोजे’ पाळल्याचे पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर पीडितेने जी आपबिती कथन केली ती धक्कादायक होती. कंपनीत काम करणारे काही ‘टीम लीडर’ हे केवळ कामाचे नियोजन करत नव्हते, तर हिंदू मुलींचे पद्धतशीरपणे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होते असे समोर आले. या प्रक्रियेत केवळ मानसिक दबावच नव्हे तर लग्नाचे आमिष आणि करिअरमधील प्रगतीचे प्रलोभन दाखवून तरुणींचे शारीरिक शोषण केले जात होते. पीडितेवर अत्याचार करून तिला एका विशिष्ट धार्मिक चौकटीत जगण्यास भाग पाडले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू अशोक खरातला तिसर्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी
गुन्हे शाखेकडे तपासाची सूत्रे
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) देवळाली कॅम्प पोलिसांत २५ मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल करत सर्व मुख्य संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासाचा हा धागा केवळ एका पीडितेपुरता मर्यादित नसून, कंपनीतील इतर अनेक तरुणी अशाच दबावाखाली असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी इतर महिला कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनीही विनयभंगाचे गंभीर आरोप केले आहेत. आता पोलीस या कंपनीतील सुमारे २०० ते २५० कर्मचाऱ्यांकडे विचारपूस आणि चौकशी करणार असून, यामागे काही मोठे नेटवर्क किंवा ‘फंडिंग’ आहे का, याचा शोध गुन्हे शाखा घेत आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती
पालकांनो सावधान!
हे प्रकरण केवळ एका गुन्हा नाही तर पालकांसाठी धोक्याची घंटा आहे. आपली मुले कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नेमकी कोणाच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या मानसिकतेत काही बदल होत आहेत का, याकडे लक्ष देणे अनिवार्य झाले आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाची लाट असून, दोर्षीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. ‘वर्क कल्चर’ च्या नावाखाली सुरू असलेल्या या ‘धार्मिक षड्यंत्राचा’ मुळापासून नायनाट करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : आजपासून ‘पेनड्राईव्ह’चा पंचनामा; खरातच्या ‘त्या’ व्हिडिओ क्लिप्सचा SIT करणार तपास





