Friday, March 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकॅप्टनच्या अश्लील चाळ्यांप्रकरणी दोन आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्री होते सतर्क, पुरावे हाती येताच पोलिसांनी...

कॅप्टनच्या अश्लील चाळ्यांप्रकरणी दोन आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्री होते सतर्क, पुरावे हाती येताच पोलिसांनी खरातच्या ‘अशा’ आवळल्या मुसक्या

मुंबई | Mumbai
नाशिकमधील अशोक खरात याच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहे. या प्रकरणी त्याला काल पोलिसांनी अटक केली, या प्रकरणी आता पोलिसांनी आणखी तपास सुरू केला असून काल त्याच्या फॉर्म हाऊस आणि निवासस्थानाची झाडाझडती घेतली. पोलिसांना त्याच्या फॉर्महाऊससमध्ये एक पिस्तूलही सापडले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन आठवड्या पूर्वीच आल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासाकरीता वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्त्वात एसआयटी स्थापन केली आहे. याआधी भोंदूबाबा खरातकडून एक पेन ड्राईव्ह पोलिसांनी जप्त केला, त्यामध्ये 58 आक्षेपार्ह्य व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ही महाराष्ट्रातील एपस्टिन फाईल असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

शेअर बाजारात हाहाकार! सेंन्सेक्स २४०० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांच्या 12 लाख कोटींवर पाणी

मुख्यमंत्र्यांनी दोन आठवड्यापूर्वीच लक्ष घातले होते
या प्रकरणी भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकार आधीपासूनच सतर्क असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन आठवड्यापूर्वीच लक्ष घातले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली होती अशी माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस महासंचालकांशी चर्चा केली होती. दोन आठवड्यापासून पोलिसांनी ही कारवाई गुप्त ठेवली होती. पोलिसांनी आधी पुरावे गोळा केले. यानंतरच पोलिसांनी धडक कारवाई केली.

व्हिडीओ क्लिप्स इतर गंबीर पुरावे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले होते
या प्रकरणात महत्त्वाचे व्हिडीओ क्लिप्स आणि इतर गंभीर पुरावे आधीच पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर अशोक खरातविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते, असंही सूत्रांनी सांगितलं.

चोर शिरल्याचे कारण देत घरात प्रवेश
पोलिसांनी अशोक खरात याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या निवासस्थान परिसरात चोर शिरल्याचे कारण दिले. अटकेची कुणकुण लागताच अशोक खरात पळून जाऊ शकतो, या शक्यतेमुळे पोलिसांनी योजनाबद्ध सापळा रचला होता. त्यानंतर एक पथक अशोक खरातच्या घरात शिरले, तर दुसरे पथक घराबाहेर तैनात होते. खरात घरात असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.

तेजस्विनी सातपुते करणार प्रकरणाचा तपास
भोंदू बाबा असलेला कॅप्टन खरात याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा सपोर्ट मिळत असल्यामुळेच त्याच्यावर कारवाई झाली नाही, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार, शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत, पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने कॅप्टन खरात प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्त्वातील एसआयटी आता या प्रकरणाचा तपास करणार आहे.

ताज्या बातम्या

ईशान्येश्वर

Ashok Kharat Crime News: अंकशास्त्राप्रमाणे नदीच्या ईशान्येला मंदीर, रविवारच्या दरबारात व्हीआयपींचा...

0
सिन्नर | प्रतिनिधीनाशिकच्या सिन्नर तालुक्यातील अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे....