Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSushama Andhare: "अघोरी विद्येसाठी अनामिका कापली, पिडीतांना रात्री फोनकरुन धमक्या"; सुषमा अंधारेंचे...

Sushama Andhare: “अघोरी विद्येसाठी अनामिका कापली, पिडीतांना रात्री फोनकरुन धमक्या”; सुषमा अंधारेंचे चाकणकरांवर खळबळजनक आरोप

पुणे | Pune
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळ ढवळून निघाल्याचे पहायला मिळत आहे, या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकरांसह अनेक राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांची नार्को टेस्टची मागणी करताना खळबळजनक आरोप केले आहेत.

अशोक खरात याने दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर या खरातची ‘पाद्यपूजा’ करत असल्याचा व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झाल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

चाकणकर दबाव आणत होत्या, त्यांचे सीडीआर तपासणे महत्वाचे
चाकणकरांनी नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. या लोकांनी अनेक वेळी अनेक लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे, काही पिडीत म्हणतात की, रूपाली चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या, काही पिडीतांचं म्हणण आहे की, चाकणकर आमच्यावरती प्रचंड दबाव आणत होत्या. त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणे गरजेचे आहे. कारण कॅप्टन खरात आणि चाकणकर यांचं किती वेळी बोलणे झाले, यासाठी साडीआर गरजेचे आहे, कॅप्टनला वाचवण्यासाठी चाकणकरने कोणाला फोन केले का? कॅप्टनने कोणाला फोन केले का? हे तपासणे गरजेचे आहे, असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.

अनेक नेत्यांचे खरातशी संबंध
राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही पक्षातील नेते खरात याच्या संपर्कात होते. रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, सरोज अहिरे, जयंत पाटील, निलेश लंके या नेतेमंडळींचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संपर्क होता. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अटक झालेला हा भोंदू बाबा अशोक खरात याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा विधी केल्या होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासंदर्भातील अनेक फोटो, तसेच व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. तसेच जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर यांहेही खरातांसोबतचे काही फोटो समोर आले होते. एवढेच नव्हे तर नोव्हेंबर २०२२ मध्ये मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरालाहीव भेट दिली होती, त्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. याच मुद्यावरून सुषमा अंधारे यांना सवाल विचारण्यात आला.

अघोरी विद्येसाठी हाताची अनामिका कापल्याचा आरोप
सुषमा अंधारे यांनी काही फोटो पुराव्यादाखल सादर करत सांगितले की, एका पीडितेने सांगितले की रुपाली चाकणकर यांनी अघोरी विद्येसाठी आपल्या हाताची अनामिका (रिंग फिंगर) कापली होती. कारण हे बोट आकर्षण यासाठी वापरले जाते. सप्टेंबर २०२४ पासून त्यांच्या बोटाला बँडेज असल्याचे फोटो अंधारे यांनी दाखवले. “२ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्या होती, आणि त्याच काळात चाकणकर यांच्या हाताला जखम झाली होती. तंत्र-मंत्र विद्येत वशीकरण आणि यशासाठी अनामिका कापली जाते,” असा दावा त्यांनी केला. त्या फोटोवर 9, 12, 20 सप्टेंबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत त्यांच्या बोटाला जखम असलेले फोटो दाखवण्यात आले.

Rupali Thombare Patil: ‘रुपाली चाकणकर फरार…बजाव टाली’; रुपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टने खळबळ

खरात याच्याशी कौटुंबिक संबंध
रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्याशी केवळ व्यावसायिकच नव्हे तर अत्यंत जवळचे कौटुंबिक संबंध आहेत. खरातच्या वडिलांच्या निधनावेळी आणि मुलीच्या लग्नातही चाकणकर अग्रभागी होत्या. इतकेच नाही तर खरातची भाची चाकणकर यांच्या घरी राहते, असाही आरोप अंधारे यांनी केला आहे.

रुपाली चाकणकरांना तातडीने अटक केली पाहीजे
सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांना तातडीने अटक केली पाहिजे. आरोपी खरात आणि चाकणकर यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी आणि नार्को टेस्ट झाली पाहिजे अशा चार प्रमुख मागण्या शिवसेनेच्या (ठाकरे) नेत्यांनी केली. त्या म्हणाल्या की, अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. तंत्रमंत्र विद्येत जर स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष गुंतलेल्या असतील तर त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. रुपाली चाकणकर फरार होण्यापूर्वी त्यांचे राजकीय वजन वापरुन दबाव आणू शकतात, त्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी अंधारे यांनी केली.

Ashok Kharat: खरातच्या करामतींनी सिन्नरकर हादरले! हिडीस रूप उघड झाल्यानंतरही त्याच्या लीलांवर बसेना विश्वास..

धमक्यांचे फोन आले
मला वेगवेगळ्या आठ नंबर वरून धमक्याचे फोन आले असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले. मला कालपासून धमक्या येत आहेत. अत्यंत वाईट पद्धतीने भाषा वापरली जात असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. आपल्याला जवळपास ७ वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आले. हे फोन क्रमांक ब्लॉक केले असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे
अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यातील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. येत्या दोन दिवसांत ही बेनामी संपत्तीची माहिती मी जाहीर करेन, असा इशाराही त्यांनी दिला. “एकीकडे स्वतःला सुधारणावादी म्हणवून घेणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा दुसरीकडे अघोरी विद्या आणि काळी जादू करत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. हा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा भंग आहे,” असे अंधारे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

संपादकीय : १ मे २०२६ – पुरोगामी प्रतिमा जपण्याचे आव्हान

0
महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा सहासष्टावा वर्धापनदिन अन्य काही दिनांप्रमाणे केवळ साजरा करण्यात मराठीजनांनी धन्यता मानली तर सध्याच्या स्थितीत ती एक मोठीच आत्मवंचना ठरेल, असे म्हटले तर...