Thursday, October 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAmol Kolhe: सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली…; खासदार डॉ. अमोल कोल्हेंची...

Amol Kolhe: सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली…; खासदार डॉ. अमोल कोल्हेंची कवितेतून रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका

पुणे | Pune
नाशिकचे वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. चाकणकर या खरातच्या पाया पडतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट कवितेच्या माध्यमातून चाकणकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

नाशिक शहर, तसेच सिन्नर येथील आलिशान बंगले, मीरगाव (ता. सिन्नर) येथे आलिशान फार्महाउस, याशिवाय अनेक जमिनी, स्वतः तसेच कुटुंबीयांच्या नावे आहेत. सोने, चांदी अन् मौल्यवान वस्तू, दोन महागड्या कार अशा एकूण तब्बल २०० कोटींच्या संपत्तीचा मालक खरात हाच असल्याचा अंदाज आहे. कुरुप विचारांचा भोंदूपणा, सगळ्या नैतिकतेचंच ‘चाक’ रुतवून टाकतो… हे महाराष्ट्र आज अनुभवतोय..!, असे कॅप्शन देत अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला आहे.

- Advertisement -

Sushama Andhare: “अघोरी विद्येसाठी अनामिका कापली, पिडीतांना रात्री फोनकरुन धमक्या”; सुषमा अंधारेंचे चाकणकरांवर खळबळजनक आरोप

महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला

जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला!

त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली

सामाजिक, कौटुंबिक कि वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली.

काठी आधाराची होती खरी, पण स्वार्गापायी मोडून पडली

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली

सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली,

गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या साऱ्या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली….

अमोल कोल्हे यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथांचा संदर्भ दिला आहे. आधुनिक काळातही आपण विचारांच्या गुलामगिरीत अडकत चाललो आहोत का, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी नेवाशातून गडाख, संगमनेरमधून देशमुख बिनविरोध

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 संचालकांच्या जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या असून आणखी तीन जागांवर बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली आहे. नेवासा...