Saturday, June 13, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : भोंदू खरात प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत; महिला IAS अधिकारी...

Ashok Kharat Crime : भोंदू खरात प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत; महिला IAS अधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat Case) काळ्या कारनाम्यांचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे प्रशासकीय वर्तुळातील धक्कादायक वास्तवही समोर येत आहे. खरातच्या जाळ्यात केवळ सर्वसामान्य नागरिकच (Citizen) नव्हे, तर उच्चपदस्थ शासकीय अधिकारी देखील अडकल्याचे संकेत मिळत असून, विशेषतः एका महिला अधिकाऱ्याचे कनेक्शन आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी पदासाठी लॉबिंग?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अधिकाऱ्याला नाशिकचे जिल्हाधिकारी पद मिळवून देण्यासाठी खरातने राजकीय पातळीवर आणि मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर लॉबिंग केल्याची वचर्चा आहे. मनाप्रमाणे पोस्टिंग मिळावी, यासाठी खरातचा प्रशासकीय बदल्यांमध्ये हस्तक्षेप होता, हे आता यातून स्पष्ट होत असून यासंदर्भातील काही महत्वाचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे समजते.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातचा पाय खोलात; दुसऱ्या गुन्ह्यात बेड्या, आज कोर्टात हजर करणार

ईशान्येश्वर मंदिरातील गुपिते खरातच्या शिवनिका

संस्थानांतर्गत येणाऱ्या सिन्नर येथील ईशान्येश्वर मंदिरात संबंधित महिला अधिकारी वारंवार हजेरी लावत असत. के वळ दर्शनासाठीच नव्हे, तर तिथे होणाऱ्या विशेष पूजा आणि विधींमध्येही त्यांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा आहे. या भेटींमागे केवळ श्रद्धा होती की काही व्यावसायिक हितसंबंध याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

मित्ररमधील जमीन व्यवहारांचा संशय

या प्रकरणाचा दसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे सिन्नर तालुक्यातील जमिनींचे व्यवहार. दुर्गम भागातील जमिनींची खरेदी करताना संबंधित अधिकायांनी खरातच्या मध्यस्थीचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारांची कागदपत्रे आणि आर्थिक देवाणघेवाण तपासली जात असून, यात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गुंतवला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातने मिरगावचा विकास निधी ईशान्येश्वर मंदिराकडे कसा वळवला? नगराध्यक्ष, नगरसेवकांनी केला भांडाफोड

प्रशासनात खळबळ

भोंदूगिरीव्या नावाखाली चालणाऱ्याः या रॅकेटमध्ये प्रशासनातील बड्या मशोचा सहभाग समोर आल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे नाशिकसह राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, येत्या काही दिवसांत तपासातून आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तपासातील महत्त्वाचे मुद्दे

  • संबंधित महिला अधिकारी आणि खरात यांच्यातील कॉल डिटेल्सची तपासणी सुरू,
  • संशयास्पद जमीन व्यवहारांची कागदपत्रे पडताळली जाणार
  • कोणत्या मंत्र्यांकडे खरातने शिफारस केली, याचा शोध सुरू

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू खरातच्या अडचणीत वाढ; दुसऱ्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

संपादकीय : १३ जून २०२६ – खांद्यावरील जू उतरले, पण व्यवस्थेचे...

0
लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड व त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई यांचे जे चित्र समाज माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये झळकले, ते आधुनिक, प्रगत आणि डिजिटल भारताचा दावा...