Tuesday, May 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshok Kharat Crime : खरातचा पाय खोलात; दुसऱ्या गुन्ह्यात बेड्या, आज ...

Ashok Kharat Crime : खरातचा पाय खोलात; दुसऱ्या गुन्ह्यात बेड्या, आज कोर्टात हजर करणार

दिल्लीतील पीडितेवरही केला अत्याचार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या विळख्यात सापडलेला स्वयंघोषित कॅप्टन ऊर्फ भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. मात्र, खरातच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नसून, दिल्लीतील गर्भपात पीडितेचा केल्याच्या दाखल दुसऱ्या गंभीर गुन्यात पुन्हा त्याचा ताबा घेतला व अटक केली. त्याला आज (गुरुवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. दुसरीकडे, शिर्डीमध्ये जमीन बळकावल्याप्रकरणी खरात कुटुंबावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

- Advertisement -

१८ मार्च रोजी अटक (Arrested) झाल्यापासून खरातला चार वेळा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. एकूण १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत खरातने मौन भूमिका स्वीकारल्याचे अनेकदा उघड झाले. एसआयटीच्या (SIT) तपासाला त्याने सहकार्य केले नसल्याने अनेक धागेदोरे अद्याप समोर आलेले नाहीत. बुधवारी (दि.१) कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायाधीश बी. एन. इचपुराणी यांच्यासमोर हजर केले असता, त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

खरातवर दाखल असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांपैकी दिल्लीतील एका पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार करून बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गुन्हा संवेदनशील आहे. या गुन्ह्यात एसआयटीला खरातची अधिक चौकशी करायची आहे. त्यासाठी सरकारवाडा पोलिसांत दाखल असलेल्या या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीने बुधवारी (दि. १) न्यायालयात अर्ज सादर केला. तेव्हा या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने ताबा घेण्यास परवानगी दिली. दरम्यान, गर्भपात प्रकरणात नाशिकमधील कोणत्या नामांकित डॉक्टरांचे हात काळे आहेत, याचा शोध घेण्यासाठी एसआयटी आता शहरातील विविध क्लिनिक्स आणि रुग्णालयांच्या नोंदी तपासणार आहे.

शिर्डीतील जमीन बळकावल्याचा नवा गुन्हा

खरातच्या पापाचा घडा एकीकडे भरत असताना शिर्डी येथील एका जमीन मालकाने अशोक खरातची पत्नी संशयित कल्पना आणि मुलगा हर्षवर्धन यांच्यासह शिर्डीतील अन्य दोघांविरुद्ध जमीन बळकावल्याची फिर्याद मंगळवारी (दि. ३१) शिर्डी पोलिसांत दाखल केली. त्यानुसार अवैध सावकारी आणि फसवणुकीच्या या नव्या गुन्ह्यामुळे खरातची पत्नी कल्पना हिच्या अटकेसाठी पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे.

मुलाची मध्यरात्रीपर्यंत चौकशी

मंगळवारी खरातच्या तृप्ताबाला बंगल्यावर पोलिसांनी भिंतीवरून उडी मारून केलेल्या कारवाईत मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतले होते. मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत एसआयटीने हर्षवर्धनची कसून चौकशी केली. चौकशीनंतर त्याला सध्या सोडून देण्यात आले असले तरी, खरातच्या काळ्या साम्राज्यात त्याचा किती सहभाग आहे, याचा तपास एसआयटी करत आहे.

दृष्टिक्षेपात

  • फरार पत्नी कल्पना यांचा शोध सुरू
  • खरातचे अनेक आर्थिक व्यवहार कल्पना हाताळत असल्याचा संशय
  • बेकायदेशीर गर्भपाताचे प्रकरण उघड
  • गर्भपाताची औषधे पुरवणारे मेडिकल चालक, एजंट रडारवर
  • खरातसह कुटुंब व इतरांवर अकरा गुन्हे नोंद
  • आठ गुन्हे लैंगिक अत्याचारासह गर्भपात व जादूटोणाविरोधी कायद्यान्वये नोंद
  • दोन गुन्हे फसवणुकीचे
  • एक गुन्हा अवैध
  • सावकारीसह जमीन बळकावल्यासंदर्भात नोंद

ताज्या बातम्या

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज रात्री सव्वानऊच्या सुमारास ओझर विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम...