Sunday, September 6, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : भोंदू खरातच्या अडचणीत वाढ; दुसऱ्या गुन्ह्यात 'इतक्या' दिवसांची...

Ashok Kharat Crime : भोंदू खरातच्या अडचणीत वाढ; दुसऱ्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक | Nashik

- Advertisement -

महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्वयंघोषित कॅप्टन ऊर्फ भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली होती. मात्र, दिल्लीतील पीडितेचा गर्भपात केल्याच्या दाखल दुसऱ्या गंभीर गुन्यात पुन्हा त्याचा ताबा घेतला व अटक केली. यानंतर आज (गुरुवारी) त्याला व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केले असता नाशिक सत्र न्यायालयाने खरातला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातचा पाय खोलात; दुसऱ्या गुन्ह्यात बेड्या, आज कोर्टात हजर करणार

नाशिक सत्र न्यायालयाने भोंदू अशोक खरातला बुधवार (दि.८) एप्रिलपर्यंत म्हणजेच सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरकारी वकिलांनी खरातची दुसऱ्या गुन्ह्यात चौकशी करायची असल्याने त्याला पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. यानंतर न्यायालयाने वकिलांची विनंती मान्य करत खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दिल्लीतील महिलेचा केला गर्भपात

खरातवर दाखल असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांपैकी दिल्लीतील एका पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार करून बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गुन्हा संवेदनशील आहे. या गुन्ह्यात एसआयटीला खरातची अधिक चौकशी करायची आहे. त्यासाठी सरकारवाडा पोलिसांत दाखल असलेल्या या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीने बुधवारी (दि. १) न्यायालयात अर्ज सादर केला. तेव्हा या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने ताबा घेण्यास परवानगी दिली. दरम्यान, गर्भपात प्रकरणात नाशिकमधील कोणत्या नामांकित डॉक्टरांचे हात काळे आहेत, याचा शोध घेण्यासाठी एसआयटी आता शहरातील विविध क्लिनिक्स आणि रुग्णालयांच्या नोंदी तपासणार आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातने मिरगावचा विकास निधी ईशान्येश्वर मंदिराकडे कसा वळवला? नगराध्यक्ष, नगरसेवकांनी केला भांडाफोड

खरातची पत्नी अद्यापही फरारच

शिर्डी येथील एका जमीन मालकाने अशोक खरातची पत्नी संशयित कल्पना आणि मुलगा हर्षवर्धन यांच्यासह शिर्डीतील अन्य दोघांविरुद्ध जमीन बळकावल्याची फिर्याद मंगळवारी (दि. ३१) शिर्डी पोलिसांत दाखल केली. त्यानुसार अवैध सावकारी आणि फसवणुकीच्या या नव्या गुन्ह्यामुळे खरातची पत्नी कल्पना हिच्या अटकेसाठी पोलिसांनी कार्यवाही केली. यानंतर पोलीसांनी तिच्या कर्मयोगिनीनगर येथील घरी जाऊन चौकशी केली होती. पंरतु, ती आढळून आली नाही. त्यामुळे तिच्या मुलांना ताब्यात घेण्यात आले. अद्याप कल्पना पोलिसांच्या हाती लागली नसून, तिचा शोध घेतला जात आहे.

ताज्या बातम्या

Vishakha Raut : ठाकरे गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत यांना झटका;...

0
मुंबई | Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत (Vishakha Raut) यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. पालघर...