Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshok Kharat: आलिशान जीवनशैली, नाशिकसह अहिल्यानगरमध्ये बेनामी मालमत्ता; खरातकडे दीड हजार कोटींची...

Ashok Kharat: आलिशान जीवनशैली, नाशिकसह अहिल्यानगरमध्ये बेनामी मालमत्ता; खरातकडे दीड हजार कोटींची माया

नाशिक | प्रतिनिधी
अध्यात्म आणि समाजसेवेचा बुरखा पांघरून भक्तांना भुरळ घालणान्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक एकनाथ खरात याच्या अफाट संपत्तीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सित्रर तालुक्यासह नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत खरातने पसरवलेल्या मालमत्तेचे जाळे पाहून एसआयटीसह विविध यंत्रणांचेही डोळे पांढरे झाले आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार, या सर्व जमिनींची आणि व्यवसायांमधील गुंतवणुकीची किंमत ५०० कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता असून स्थावर आणि जंगम मालमत्तेचा किंमत दीड हजार कोटी पार जाण्याची शक्यता आहे. यात ३० हुन अधिक ठिकाणी भूखंडांची खरेदी केल्याचे माहितीतून समोर आले आहे. अशोक खरात याने केवळ स्वतःच्याच नव्हे, तर पत्नी, मुलगी आणि जवळच्या नातेवाईकांच्या नावावर मालमत्तांचा डोंगर उभा केला आहे. प्राप्त झालेल्या ७/१२ उत्ताऱ्यांच्या कागदपत्रांनुसार, एकट्या नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी शिवारात खरात परिवाराच्या नावावर अनेक मोक्याचे भूखंड आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाथर्डी – २ सर्व्हे क्र. १९२/१/३/२, १९३/२/१ (प्लॉट १ आणि ३६), १९५/३ (प्लॉट १३), १९९/१/३९ (प्लटि ३९), २००/२/अ (प्लॉट ४) आणि २०२/२ तसेच सिन्नरला कुंदेवाडी, मुसळगाव, आणि सिन्नर शहरात अनेक ठिकाणी निवासी व व्यावसायिक भूखंडांची खरेदी करण्यात आली आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव कोन्हाळे, निघोज आणि शिर्डी परिसरातही खरातने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचे पुढे येत आहे.

- Advertisement -

Rupali Chakankar: “अशोक खरातला मी गुरु मानलेलं, पण…”; राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण

कुटुंबीयांच्या नावावर व्यवहार ?
खरातची पत्नी कल्पना, मुलगी सुष्टी आणि नातेवाईक दत्तात्रय यांच्या नावावर अनेक मालमत्तांची नोंद आढळली आहे. विशेष म्हणजे, खरातचे सिन्नर-शिर्डी रस्त्यावर ‘शिवसंकल्प’ नावाचे एक भव्य हार्डवेअर दुकान आहे. हे दुकान पत्नी कल्पना खरात यांच्या नावावर असून, त्याचा पूर्ण कारभार खरातचा मेव्हणा पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, बांधकाम व्यवसायातही खरातची मोठी भागीदारी असून अनेक प्रकल्पांमध्ये त्याने कोट्यावधी रुपये गुंतवले आहेत.

आलिशान जीवनशैली आणि ‘तृप्तबाला’
अशोक खरात सध्या नाशिकमधील कर्मयोगीनगर भागात असलेल्या ‘तृप्तबाला’ (प्लॉट नं. ३७) या अत्यंत आलिशान बंगल्यात वास्तव्यास आहे. सामान्य परिवारातून आलेल्या व्यक्तीकडे इतक्या कमी कालावधीत ५०० कोटींची संपती आली कुठून, हा आत तपासाचा मुख्य विषय बनला आहे, त्याचे अनेक जमिनींचे व्यवहार संशयास्पद असून, यामध्ये बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता कायदेशीर तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : एक कोटींच्या लुटीच्या कटात दोन पोलिसांसह तोतया पत्रकाराचा...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलावर भरदिवसा एका मोठ्या व्यावसायिकाला लुटण्याचा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला असून, याप्रकरणी पुणे...