Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedआश्रम शाळेतील शिक्षकाची आत्महत्या

आश्रम शाळेतील शिक्षकाची आत्महत्या

पिंपळनेर  – 

साक्री तालूक्यातील बोफखेल येथील शासकिय आश्रम शाळेतील शिक्षकाने पिंपळनेर येथील सटाणा रोडवरील अपार्टमेंट मधील तिसर्‍या मजल्यावरील राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

पिंपळनेर येथील सटाणारोड वरील सुदेक पॅराडाईज अपार्टमेंट मधील तिसर्‍या मजल्यावर भाडेतत्वावर बोफखेल येथील शासकिय आश्रम शाळेतील शिक्षक विशाल ज्ञानदेवराव पुंडे (वय 34 वर्षे) हे राहतात. त्यांनी त्यांच्या घराच्या बेडरुम मधील पंख्याच्या कडीला साडीने गळफास घेवून आज सकाळी आत्महत्या केली. त्यांचे मुळगाव अकोला आहे.

घटनेची माहिती निलेश यांना मयत विशाल यांची पत्नी सौ. मोनाली पुंडे यांनी दिली. त्यानंतर सुदेव पॅराडाईजचे संचालक निलेश गणेश साबळे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात माहिती दिली.

मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पिंपळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनिल साळूखे हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...