Friday, May 3, 2024
Homeनगरसंगमनेर : हंगेवाडीत नियोजित वधूची आत्महत्या

संगमनेर : हंगेवाडीत नियोजित वधूची आत्महत्या

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील विवाह ठरलेल्या 26 वर्षिय तरुणीस होणार्‍या पतीने मुलगी अपशकून असल्याचे हिणवून लग्न मोडले.

- Advertisement -

हा धक्का सहन न झाल्याने तिने शेजारील पाण्याने भरलेल्या विहिरीत उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली तर साखरपुड्यात दिलेले दागिने चांगल्या डिझाईनचे बनवतो म्हणून घेवून जावून फसवणूक केल्याने आश्वी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आश्वी पोलिस ठाण्यात किरण भास्कर सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवार दि. 5 नोव्हेबर 2020 रोजी सकाळी 7 वाजेच्या पूर्वी हंगेवाडी शिवारात पांडुरंग लक्ष्मण सांगळे यांच्या शेतातील विहीरी मध्ये भारती भास्कर सांगळे ही मुलगी मृतावस्थेत आढळूून आली. मयत भारती भास्कर सांगळे हिचा मुंबई येथील सागर अर्जुन सानप यांच्या बरोबर विवाह ठरला होता.

दि. 20 जून 2020 रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. मुलीच्या घरच्यांनी मुलाला एक तोळा सोन्याचे अंगठी व दोन लाख रुपये विश्वासाने दिले होते. तसेच आरोपींनी मयत भारती हिस दोन तोळे सोन्याचे नेकलेस व कानातील दागिने दिले होते. मात्र साखरपुडयानंतर सागर सानप याने मुुलीच्या घरच्याशी चांगले संबंध ठेवून त्यांचा विश्वास संपादन करून मयत भारती हीचे साखरपुड्यात दिलेले दागिणे व्यवस्थित करून आणतो असे सांगून घेऊन गेला.

त्यानंतर दि. 11 आक्टोबर 2020 रोजी सागर याने मयत भारती हिस फोन वरून तुझ्या घरचे आमच्यासाठी अपशकून असल्याचा आरोप करत ठरलेला विवाह मोडल्याचे सांगितले. तर साखरपुडातील दागिने व रोख रक्कम दिल्याचे ना कबूल झाल्याचे दिवसाढवळ्या त्याचा अपहार केला तसेच आरोपी यांनी मयत व फिर्यादीच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून पुन्हा आमच्याशी संपर्क करू नका, असा दम दिला. हा धक्का सहन न झाल्याने भारती हिने 5 नोव्हेबर 2020 रोजी सकाळी 7 वाजता हंगेवाडी शिवारातील विहिरीमध्ये आत्महत्या केली.

या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात सागर अर्जुन सानप, अर्जुन केशव सानप, सुजाता अर्जुन सानप, स्नेहा तुषार आव्हाड या चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, सोन्याच्या दागिने व पैसाची हेराफेरी करुन अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 431/2020 कलम 306, 406, 504, 34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या