Tuesday, June 17, 2025
Homeनगरआश्वी परिसरातील अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

आश्वी परिसरातील अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

मटका पेढ्यांसह जुगार अड्डे बिनधास्तपणे सुरू

आश्वी |वार्ताहर| Ashwi

कायद्याने मटक्यावर बंदी असतानाही संगमनेर तालुक्यातील आश्वी आणि परिसरातील काही गावांमध्ये मटक्याबरोबरच जुगार अड्डे देखील जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व अवैध धंदे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर कायद्याचा धाक निर्माण करणारे पोलीस मात्र या अवैध धंद्याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागत असून गोरगरीबांच्या खिशातले पैसे मटका व जुगार अड्डे चालवणार्‍यांकडून ओरबाडले जात असल्याने सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.

- Advertisement -

आश्वी आणि परिसरात मटक्याप्रमाणेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये खुलेआमपणे वर्दळीच्या ठिकाणी जुगार सुरु आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला व शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पण हा सगळा प्रकार पोलिसांच्या नाकासमोर सुरु असताना ते नेमका कानाडोळा का करतात? याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये हप्ते घेऊन संरक्षण देण्यात पोलीस मश्गुल असल्याची जोरदार चर्चा आहे. तर पोलिसांचे संरक्षण असल्यामुळे हे अवैध धंदे सुरू असल्याचा गंभीर आरोप आता नागरिक करु लागले आहेत.

त्यामुळे मटका व जुगार अड्ड्यावर कारवाई करुन पोलीस नागरीकांमध्ये सुरू असलेल्या या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी कारवाई करणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान आश्वी परिसरात पोलिसांची मलीन होत चाललेली प्रतिमा सुधारण्यासाठी संगमनेरच्या उपअधीक्षकांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान, दोन ते महिन्यातून एकदा नगर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी हे खासगी वाहनाने आश्वी येथील मटका पिढ्या सुरू असलेल्या ठिकाणी येतात अशी चर्चा आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

चीफ

मोठी बातमी! इस्राईलचा इराणला आणखी एक दणका; चीफ ऑफ आर्मी स्टाफ...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात इस्राइलने इराणमधील...