Saturday, May 2, 2026
HomeनगरAhilyanagar : एएसपी कलुबर्मे यांच्यासह 10 जणांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

Ahilyanagar : एएसपी कलुबर्मे यांच्यासह 10 जणांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राज्यातील 800 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्र दिनी गौरविण्यात येणार आहे. यात अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्यासह चार अधिकारी आणि सहा अंमलदारांचा समावेश आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी ही यादी जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.
कलुबर्मे यांनी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्याकडे अहिल्यानगर (दक्षिण) अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार आहे. 15 वर्षाच्या सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

- Advertisement -

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, बिनतारी संदेश विभागाचे पोलीस निरीक्षक मुख्तारखान गुलजारखान पठाण, सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते या अधिकार्‍यांसह पोलीस अंमलदार नितीन गांगुर्डे (अहिल्यानगर तालुका), मनोहर शेजवळ (वाचक शाखा), अजय नगरे (आर्थिक गुन्हे शाखा), संजय खंडागळे (पोलीस मुख्यालय), गोविंद गोल्हार (भिंगार कॅम्प), राजु सुद्रिक (एमआयडीसी) या सहा जणांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार्‍या समारंभात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याहस्ते हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. अंमलदार राजु सुद्रिक हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी 15 वर्षाच्या सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल त्यांचा गौरव केला जाणार आहे. जिल्हा पोलीस दलात त्यांनी कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.
पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्राप्त करणे हा एक मोठा मान आहे. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांची मेहनत, निष्ठा आणि कर्तव्यपरायणतेला हा सन्मान मिळाल्यामुळे ते पुढील कार्यासाठी प्रेरित होतील. पोलीस अंमलदारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ताज्या बातम्या

Pune Bhor Crime News : नराधमाचा चिमुरडीवर अत्याचार; CM फडणवीसांची पहिली...

0
मुंबई | Mumbai पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोर तालुक्याच्या (Bhor Taluka) नरसापूर परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (Rape) करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Murder)...