आसाम | Assam
आसाममध्ये रविवारी सायंकाळी 4:41 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. ५. ८ रिश्टर स्केलचे हे धक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे मुख्य केंद्र आसाममधील उदलगुडी येथे जमीनीपासून पाच किलोमीटर आत नोंदवण्यात आले आहे. भुकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली असून नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, आसामच्या काही भागांमध्ये रविवारी सायंकाळी ४.४१ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. आसामच्या उत्तर पूर्व भागामध्ये हे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्रबिंदू उदलगुरी जिल्ह्यात होते. भूकंपाची खोली ५ किमी इतकी नोंदवली गेली. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गुवाहाटीमध्ये या भुकंपाची तिव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. या भुकंपाचे झटके आसाम, मेघालय, नागालँड, मिझोरम, मणिपूर सारख्या राज्यांमध्ये जाणवले गेले. काही सेकंदांपर्यंत चाललेल्या या भुकंपामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, असे स्थानिकांनी सांगितले. तर काहींनी सांगितले की, भूकंपाचे धक्के जाणवत असताना ते थांबणारच नाही असे वाटत होते. असे वाटत होते की आता घराचे छत कोसळेल’ मात्र, लवकरच परिस्थिती सामान्य झाली.
या आधी गेल्या दोन आठवड्यापूर्वीही २ सप्टेंबरदरम्यान देखील आसामच्या सोनितपूरमध्ये ३.५ तिव्रतेचे भुकंपाचे धक्के जाणवले होते. दरम्यान, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भूकंपाबाबत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





