Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशElection Result 2022 : उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांत मतमोजणी सुरु, वाचा...

Election Result 2022 : उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांत मतमोजणी सुरु, वाचा ताजे अपडेट्स एका क्लिक वर

गेल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेले विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आघाडीवर आले आहेत.पणजीतून उत्पल पर्रिकर यांचा पराभवपंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने बहुमताचा आकडा पार केल्यामुळे आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांच्या संगरूर येथील निवासस्थानी कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.पंजाबमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार आप तब्बल ८० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १५ आणि भाजप ५ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष हा सत्तेकडे वाटचाल करताना दिसत आहे.उत्तर प्रदेशमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठला; भाजपने २०३ जागांवर तर समाजवादी पक्षाची १०० जागांवर आघाडीपंजाबमध्ये आपने मोठी आघाडी घेतली असून, आपचे उमेदवार ६० हुन अधिक जागांवर आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पिछाडीवर गेले असून, काँग्रेसचे उमेदवार ३८ जागांवर आघाडीवर आहेत.उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस सुरू आहे. दोन्ही पक्ष सध्या प्रत्येकी ३४ जागांवर आघाडीवरगोव्यात काही वेळापूर्वी भाजप सर्वाधिक जागांवर होते मात्र आता गोव्यात काँग्रेस २० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप १६ जागांवर तर टीएमसी केवळ ४ जागांवर आघाडीवर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी 34 जागांवर आघाडीवरउत्तराखंडमध्ये भाजप ३० जागांवर तर काँग्रेस २८ जागांवर आघाडीवरउत्तरप्रदेशमध्ये भाजप १३५ जागांवर तर सपा ८० जागांवर आघाडीवर, बसपा ५ तर काँग्रेस ३ आणि इतर ३ जागांवर आघाडीवर आहे.गोव्यात भाजप आणि काँग्रेस दोघांनी खातं उघडलं; सुरुवातीच्या कलांमध्ये दोन्ही पक्षांना १-१ जागेवर आघाडीउत्तराखंडमध्ये ७० जागांपैकी १५ जागांवर भाजपा आघाडीवर आणि काँग्रेस ८ जागांवर आघाडीवरउत्तराखंडमध्ये पहिला कल भाजपलाउत्तर प्रदेशमध्ये भाजप २५ जागांवर आघाडीवर, सपा १८ जागांवर आघाडीवरउत्तरप्रदेशातून सुरवातीचे कल हाती, भाजपाची आघाडीपोस्टल मतमोजणीला सुरुवात, निकालाआधीच अनेक ठिकाणी सेलिब्रेशन सुरु

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीची पूर्वपरीक्षा म्हणून पाहिल्या गेलेल्या उत्तर प्रदेश (Uttarpradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी (votes counting for assembly elections) सुरु झाली आहे. या राज्यांतील मतदार कोणता जनादेश देतात याची उत्सूकता राजकीय पक्षांसह देशवासीयांना लागली आहे. पंजाब वगळता उत्तर प्रदेश आणि इतर ४ राज्यांत भाजपची सत्ता आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसल्याने ४ राज्यांत भाजपची प्रतिष्ठा पणास लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या