Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Political : येवल्यात १७ उमेदवारांची माघार; १३ जण निवडणुकीच्या रिंगणात

Nashik Political : येवल्यात १७ उमेदवारांची माघार; १३ जण निवडणुकीच्या रिंगणात

येवला | प्रतिनिधी | Yeola

आज विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातून ३३७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज माघारीच्या शेवटच्या दिवशी १३७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता १५ विधानसभा मतदारसंघांत २०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या एका जागेसाठी १७ उमेदवार रिंगणात; मुख्य लढत ‘या’ चौघांमध्ये होण्याची शक्यता

यामध्ये येवला विधानसभा मतदारसंघातून (Yeola Assembly Constituency) १३ उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमवणार आहेत. येवला मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ३० पैकी १७ उमेदवारांनी (Candidates) आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात १३ उमेदवार राहिले असले तरी महायुतीचे मंत्री छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे अ‍ॅड. माणिकराव शिंदे अशी सरळ लढत होणार आहे.

हे देखील वाचा : Assembly Elections 2024 : नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी २०० उमेदवार रिंगणात; १३७ जणांनी घेतली माघार

दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीच्या आज शेवटच्या दिवशी शिवसेना (उबाठा) ग्रामीण जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, राष्ट्रवादी (शपा) पक्षातील इच्छुक सचिन आहेर, गोरख पवार, जयदत्त होळकर या प्रमुखांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीतील बंडखोरी थांबली. तर बहुजन समाज पार्टीचे पौलस अहिरे, राष्ट्रीय स्वाभिमानी सेनेचे शेरूभाई मोमीन या पक्षीय उमेदवारांसह अपक्ष अशा एकूण १७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणातील ४ पक्षीय उमेदवारांसह ९ अपक्ष अशा १३ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या