Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या एका जागेसाठी १७ उमेदवार रिंगणात; मुख्य लढत...

Nashik Political : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या एका जागेसाठी १७ उमेदवार रिंगणात; मुख्य लढत ‘या’ चौघांमध्ये होण्याची शक्यता

नाशिक | Nashik

आज विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील (District) १५ विधानसभा मतदारसंघातून ३३७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज माघारीच्या शेवटच्या दिवशी १३७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता १५ विधानसभा मतदारसंघांत २०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून १७ उमेदवार रिंगणात असून याठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Assembly Elections 2024 : नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी २०० उमेदवार रिंगणात; १३७ जणांनी घेतली माघार

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency) राष्ट्रवादीचे (अजित पवार) हिरामण खोसकर, काँग्रेसचे (Congress) लकी जाधव, मनसेचे (MNS) काशिनाथ मेंगाळ आणि माजी आमदार व अपक्ष उमेदवार (Independent Candidate) निर्मला गावित यांच्यामध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर माघारीच्या दिवशी ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीचे बंड शमले; डॉ.हेमलता पाटील यांची माघार

उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये वामन खोसकर, अनिता घारे, संदीप जाधव, विष्णू दोबाडे, गोपाळ लहांगे, कावजी ठाकरे, नरेश घारे, जीवनकुमार भोये, वैभव ठाकूर, रवींद्र भोये आणि काशिनाथ मेंगाळ यांच्या नावाचा समावेश आहे. मेंगाळ यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात एक पक्षाचा अधिकृत आणि दुसरा अपक्ष अर्ज होता. यामध्ये मेंगाळ यांनी अपक्ष अर्ज मागे घेत पक्षाचा अधिकृत अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे आता या मतदारसंघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला दिलासा मिळणार; ‘हे’ दोन तगडे नेते माघार घेणार?

सध्याच्या घडीला या मतदारसंघात हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांचे पारडे जड मानले जात आहे. कारण त्यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. तर काँग्रेसने लकी जाधव (Lucky Jadhav) यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नाराजी आहे. त्यामुळे याचाही मोठ्या प्रमाणावर फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवली आहे. तर काशिनाथ मेंगाळ (Kashinath Mengal) यांना त्यांच्या समाजाचे असणारे एकगठ्ठा मतदान व युती-आघाडीकडून मिळणार छुपा पाठिंबा यामुळे तेही निवडणुकीत चांगली लढत देऊ शकतात.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक पश्चिम मतदारसंघातून ‘या’ उमेदवारांनी घेतली माघार

याशिवाय माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) या देखील खोसकर, जाधव आणि मेंगाळ यांना चांगली टक्कर देण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या मागील १० वर्षांच्या आमदारकीच्या कारकि‍र्दीत त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत आपली विकासकामे पोहचवली आहेत. तसेच यंदा मतदारसंघातील लोकांच्या आग्रहामुळे गावित यांनी उमेदवारी केली असून लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्यास इतर तीनही उमेदवारांना निवडणूक (Election) जड जाण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या