Monday, October 5, 2026
Homeदेश विदेशभारतीय वायू दलाच्या एएन-३२ मालवाहू विमानाचा आसाममध्ये अपघात; अपघातात विमानाचे दोन तुकडे

भारतीय वायू दलाच्या एएन-३२ मालवाहू विमानाचा आसाममध्ये अपघात; अपघातात विमानाचे दोन तुकडे

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय वायू दलाचे ‘एएन-३२’ हे मालवाहू विमान आसाममधील जोरहाट येथे दुर्घटनाग्रस्त झाले आहे. शनिवारी सकाळी हे विमान जोरहाट येथील लष्करी तळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात विमानाचे थेट दोन तुकडे झाले. घटनास्थळावरून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघत होत्या. विमानाचा अपघात होताच काही वेळात बचाव कार्य राबवण्यात आले. मात्र, हा अपघात नक्की कसा झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाहीये.

मला माफ करा, मला एक संधी द्या…! ३७० रुपयांची बिर्याणी’ वादावर प्रणित मोरे यांची जाहीर माफी

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, विमान लँड होत असताना त्याला आग लागली. विमानाला आग लागल्यानंतर एअरबेसमधील आपात्कालीन सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणांनी विमानाच्या दिशेने धाव घेतली. भारतीय वायू दलाचे ‘एएन-३२’ हे माल वाहतूक करणारे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती संरक्षण प्रवक्त्यांनी दिली आहे. अपघात होताच अग्निशमन दल आणि आपात्कालीन पथकाने तातडीने धाव घेत पायलट आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम केले. विमानातील जीवितहानी किंवा अपघाताच्या अचूक कारणांबाबत अद्याप वायुसेनेकडून अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.

विमान दुर्घटनाग्रस्त का झाले? या अपघातात जीवितहानी झाली आहे का? किती नुकसान झाले याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. विमानाला आग का लागली याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. दरम्यान, घटनास्थळी अधिकारी पोहोचत असून परिस्थिती जाणून घेतल्यानंतर ते या दुर्घटनेबाबत अधिक माहिती देतील.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : मतदार यादीची सखोल पडताळणी आवश्यक; CM फडणवीसांची पोस्ट,...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai विरोधी पक्षाने मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिम रद्द करण्याची मागणी केली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एसआयआरचे...