Friday, May 3, 2024
Homeनाशिकलासलगाव मर्चंट्स बँक अध्यक्षपदी गवळी

लासलगाव मर्चंट्स बँक अध्यक्षपदी गवळी

लासलगाव । Lasalgaon (वार्ताहर)

लासलगाव मर्चंट्स को-ऑपबँकेच्या अध्यक्षपदी अशोक शिवराम गवळी यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र शिवाजी घोलप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

- Advertisement -

बँकचे मावळते अध्यक्ष संजय कासट, उपाध्यक्ष सोमनाथ शिरसाट यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नूतन पदाधिकारी निवड करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बँकेच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे होते.

नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार मावळत्या पदाधिकार्‍यांनी केला. याप्रसंगी संचालक अजय ब्रह्मेचा, डी. के. जगताप, संतोष पलोड, संगीता पाटील, सचिन मालपाणी, प्रवीण कदम यांनी मनोगत व्यक्त करून नूतन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या. बँकेचे अध्यक्ष गवळी यांनी संचालक मंडळाच्या सहकार्‍यांनी बँकेचे नेट एन. पी. ए. शून्य करण्याचा प्रयत्न करील.

थकबाकी वसुलीसाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच बँकेच्या मुख्य कार्यालय शाखेत ए. टी. एम. सेवा लवकर सुरू करण्यात येईल, असे सांगितले. बँकेच्या सेवकांतर्फे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एम. रसाळ, जनरल मॅनजर एम. टी. जाधव, मुंबई बाजार समितिचे संचालक जयदत्त होळकर यांनी नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार केला.

याप्रसंगी बँकेचे संचालक किसन दराडे, पारसमल ब्रह्मेचा, सचिन शिंदे, ओमप्रकाश राका, हर्षद पानगव्हाणे, अर्चना पानगव्हाणे यांचेसह सर्व सोळा संचालक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या