Tuesday, September 8, 2026
HomeराजकीयMPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; पुण्यात मोर्चा, रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; पुण्यात मोर्चा, रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

पुणे । Pune

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात आज पुण्यातील रस्त्यांवर तरुणाईचा प्रचंड असंतोष उफाळून आला. लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि MPSC च्या पारदर्शकतेसाठी आज (७ सप्टेंबर) पुण्यात ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

- Advertisement -

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर सकाळी १० वाजता या भव्य मोर्चाला सुरुवात झाली. हातात विविध मागण्यांचे फलक आणि सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत हजारो परीक्षार्थी रस्त्यावर उतरले. MPSC च्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी, घोटाळेबाजांवर कडक कारवाई करावी आणि आयोगाचे तात्काळ शुद्धीकरण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या प्रमुख विरोधी पक्षांनी जाहीर पाठिंबा दर्शवला.

खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी स्वतः या मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसले. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या परीक्षांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर प्रश्न विचारायचे नाहीत का? यात कसले आले आहे राजकारण? हा राजकीय लढा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा आणि न्यायाचा लढा आहे,” असा थेट आणि संतप्त सवाल त्यांनी सरकारला विचारला.

दरम्यान, MPSC च्या उत्पादन शुल्क (विभागीय) परीक्षेत मार्किंग पॅटर्न लीक प्रकरणी खुद्द आयोगाच्या सहसचिव दर्जाचा अधिकारी दोषी असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून अभ्यास करायचा आणि तिकडे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पेपर विकायचे, हे आता अजिबात खपवून घेतले जाणार नाही. MPSC च्या संपूर्ण शुद्धीकरणाशिवाय हा लढा थांबणार नाही. आयोगाच्या अध्यक्षांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांना त्वरित पदावरून हटवून चौकशी झाली पाहिजे.”

ताज्या बातम्या

विखे

Radhakrishna Vikhe Patil: मोठी बातमी! जरांगेंचं समाधान होत नसेल तर…विखे पाटलांचं...

0
मुंबई | Mumbaiमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा ११ वा दिवस आहे. सोमवारी मध्यरात्री त्यांची तब्येत अजून खालावली आहे. मंत्री उदय सामंत...