Thursday, May 2, 2024
Homeनगरशिर्डीच्या जावयाचा नेवासा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

शिर्डीच्या जावयाचा नेवासा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील गोगलगाव येथे माहेरी आलेल्या पत्नीने पतीसोबत सासरी जाण्यास नकार दिल्याने शिर्डीच्या तरुणाने नेवासा पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेऊन

- Advertisement -

आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल घडली. याप्रकरणी सदर तरुणावर आत्महत्येच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सतीश गोरक्षानाथ देसाई (वय 30)यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, दि. 27 सप्टेंबर रोजी मी वायरलेस ड्युटीवर असताना मी तसेच पोलीस उपनिरीक्षक शेवाळे, पोलीस नाईक श्री. तमनर, महेश कचे, कॉन्स्टेबल ईथापे, भागवत शिदे, महिला कॉन्स्टेबल शिंदे असे नेवासा पोलीस ठाण्याच्या आवारात उभे होतो.

त्यावेळी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास एक तरुण पोलीस ठाण्याच्या गेटसमोर त्याच्या ताब्यातील मोटारसायकलवरून (एमएच 17 बी. डब्लू 0114) आला. गाडीवरून उतरला व त्यानंतर त्याने डिक्कीमधून एक पेट्रोलची बाटली काढली व स्वतःचे अंगावर ओतून घेतली. तो आत्महत्या करणेचा प्रयत्न करित होता.

म्हणून मी व अन्य कर्मचारी असे ताबडतोब त्याचेकडे पळत गेलो. त्याला पकडून त्याचे नाव गावाबाबत चौकशी केली असता त्याचे नाव गणपत दगडु पवार (वय 35) (रा. श्रीरामनगर, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर) असे असल्याचे समजले. त्यानंतर त्याचे आत्महत्येबाबत प्रयत्न केल्याचे कारणाची चौकशी करता त्याने सागितले, मी व माझी पत्नी सारिका असे दोघे आम्ही काल दि 26 सप्टेंबर 2020 रोजी तिचे माहेरी गोगलगाव ता. नेवासा येथे भेटण्यासाठी आलो होतो. मी पत्नीला माहेरी सोडून परत माझे गावी शिर्डी येथे गेलो.

आज रोजी सकाळी मी पुन्हा सासुरवाडी गोगलगाव येथे पत्नीला परत सोबत घेवून जाणे करिता गेलो असता सासु-सासरे म्हणाले की आज तुझे पत्नीला नेऊ नको नंतर घेवुन जा. यावरुन आमच्यात वाद झाले. पत्नीस त्याचे सोबत पाठविले नाही. याचा राग मनात धरुन हा तरूण गाडीचे डिक्कीमध्ये पेट्रोल बाटली घेवून आला व अंगावर पेट्रोल ओतुन घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या फिर्यादीवरुन त्याचे विरुध्द भारतीय दंड विधान कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या