Friday, May 3, 2024
Homeनाशिकथकबाकी वसुलीचे एसटीकडून प्रयत्न

थकबाकी वसुलीचे एसटीकडून प्रयत्न

नाशिक । प्रतिनिधी

करोनामुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला. तर यंदाही केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होत असल्याने महामंडळाकडून शासनाकडे थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

राज्य परिवहन महामंडळाने मागीलवर्षी परप्रांतीय मजुरांची वाहतूक केली. त्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी मालवाहू बसेसेच्या माध्यमातून देखील शासनाच्या इतर विभागांच्या साहित्यांची वाहतूक केली. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे परप्रांतीय तसेच मालाची वाहतूक करण्यात आली होती. यातील काही रक्कम शासनाने अदा केलेली आहे तर काही रक्कम बाकी आहे.

पोलीस तसेच आरोग्य विभागालादेखील अत्यावश्यक सेवेनुसार बसेस पुरविण्यात आलेल्या आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून बसेस बंद असल्याने आता पुढील महिन्यात कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आता थकीत रक्कम वसुलीसाठी शासनाकडे महामंडळाकडून मागणी करण्यात आली आहे.

मिळाली थकबाकी

परप्रांतीय मुजरांना विविध राज्यांच्या सीमारेषेवर सेाडण्यासाठी महामंहळाने बसेस पुरविल्या. नाशिक विभागाने देखील या काळात परप्रांतीय मुजरांची वाहतूक केली. यापोटी देय असलेली रक्कम राज्य शासनाकडून मिळाली असल्याने नाशिक विभागाचा प्रश्न काहीप्रमाणात मिटला आहे. सर्वात मोठी वाहतूक नाशिक विभागाने केलेली होती. त्यामुळे नाशिकला देय असलेली रक्कम मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या