Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रगर्भातील बाळाला बाहेरून रक्तपुरवठा करण्याची दुर्मिळ प्रक्रिया यशस्वी

गर्भातील बाळाला बाहेरून रक्तपुरवठा करण्याची दुर्मिळ प्रक्रिया यशस्वी

औरंगाबाद – Aurangabad – प्रतिनिधी :

गर्भात असलेल्या बाळाचे रक्त कमी प्रमाणात तयार होत असल्याचे परीक्षणात लक्षात आल्याने वेळीच त्या बाळाला

- Advertisement -

बाहेरून रक्तपुरवठा करण्याची अत्यंत दुर्मिळ अशी उपचार प्रक्रिया यशस्वी करण्यात आली असून आजघडीला ते बाळ आणि माता सुखरूप आहेत. के-पॉण्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फेटल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रार्थना शाह (देशपांडे) यांनी ही प्रक्रिया घडवून आणली. विशेष म्हणजे मराठवाड्यात प्रथमच अशाप्रकारची प्रक्रिया करण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना फेटल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रार्थना शाह (देशपांडे) म्हणाल्या की, एक दाम्पत्य के-पॉण्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आले होते. या दाम्पत्याने ३ बाळांना त्यांना जन्माआधीच गमावले होते. त्यामुळे ते अत्यंत हताश होते.

आपल्याला बाळ होते खरे परंतु ते दगावत असल्याने यामागे नेमके काय कारण आहे? हे त्या दाम्पत्याला समजेना.

त्या दाम्पत्याची संपूर्ण माहिती घेत त्यांची मेडिकल हिस्ट्री अर्थात आजवरच्या सर्व तपासण्यांच्या अहवालावर अभ्यास केला असता बऱ्याच बाबी समोर येत गेल्या. स्त्री आणि पुरुष यांच्यातील रक्तगटातील तफावतीमुळे त्यांचे बाळ दगावत असल्याचे लक्षात आले.

स्त्री Rh (-) तर पुरुष Rh (+) दुसऱ्या बाळाला जन्म देताना शरीरातील पेशी वेगळ्या पद्धतीने वर्तणूक करतात. विशेषतः अँटीबॉडी बाळाच्या पेशीला अँटीजेन समजून त्यावर आघात करतात. त्यामुळे बाळाच्या शरीरातील रक्त कमी होत जाते.

त्याचा परिणाम बाळाच्या जीवाला धोका देखील निर्माण होण्याची शक्यता असते. गर्भातील बाळ सहा महिन्याचे असताना सोनोग्राफीत या बाबी पुढे आल्या. के-पॉण्डमध्ये सोनोग्राफीद्वारे रक्ताचे प्रमाण तपासण्याची क्षमता असणारी व्यवस्था असल्याने पुढील प्रक्रिया काय करावयाच्या आहेत हे लक्षात येणे सोपे झाले.

गर्भातील बाळाच्या रक्ताचे नमुने लाईफ सेल याठिकाणी करण्यात आल्या. यामध्ये काही वास्तविकता समोर आल्या. दाम्पत्याला कौटुंबिक रक्तगटाची समस्या आणि सद्यःस्थितीत बाळाचे रक्त कमी होत आहे या गोष्टी प्रामुख्याने दिसून आल्या.

हे निदान लक्षात आल्यावर उपचाराच्या पुढील दिशा निश्चित करण्यात आल्या. आधुनिक अशी Intrauterine blood transfusion ही अत्यंत किचकट प्रक्रिया असून दोन ते तीन टप्प्यात ही प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात आली.

संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली. प्रसूतीनंतर हे बाळ सुखरूप आहे. जन्मतः त्या बाळाचे वजन, हिमोग्लोबिन हे नॉर्मल आले आहे. चाळीसगावसारख्या दुर्गम भागातील या दाम्पत्याला वेळेवर योग्य सल्ला, निदान व उपचार देण्यात यश आल्याचे के-पॉण्ड परिवाराला समाधान आहे.

के-पॉण्डमध्ये पोटातील अर्भकाच्या विविध आजारांचे निदान व उपचार करण्यात येतात. गर्भवती स्त्रीच्या विविध सोनोग्राफी, ज्यात अर्भकाचे हृदय, मेंदू यासाठी विशेष सोनोग्राफी जाते. परिवारातील सदस्य अथवा पहिल्या बाळाला काही आजार असल्यास तसेच पुढील बाळात तो आजार उदभवेल का यासाठीच्याही तपासण्या केल्या जातात.

वारंवार गर्भपाताची समस्या असणाऱ्या जोडप्याला योग्य त्या तपासण्या आणि मार्गदर्शन देखील याठिकाणी केले जाते, असेही फेटल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रार्थना शाह (देशपांडे) यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेला के-पॉण्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. वर्षा वैद्य, डॉ. विरंची वैद्य, डॉ. श्रद्धा चांडक, लाईफ सेलचे क्षेत्रीय प्रमुख प्रवीण सरदेशपांडे, जिल्हा व्यवस्थापक सतीश म्हेत्रे, विभागीय प्रमुख संतोष श्रीवास्तव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या