Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedडॉ.आरतीश्यामल जोशींना पहिला 'जाणीव पुरस्कार'

डॉ.आरतीश्यामल जोशींना पहिला ‘जाणीव पुरस्कार’

औरंगाबाद – aurangabad

अनाथ, अपंग, दिव्यांग, अंध व एड्सग्रस्त मुले यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने शहरातील क्रेझी फ्रेंड्स ग्रुपच्या (Crazy Friends Group) वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘रंग दे बसंती’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला.

- Advertisement -

यंदा या कार्यक्रमाचे नववे पर्व होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात भगवान बाबा बालिकाश्रम, बाबासाई एड्सग्रस्त मुला-मुलींचे बालगृह, उत्कर्ष अपंग प्रशिक्षण संस्था, लायन्स बालकाश्रम, शोभना बालकाश्रम तसेच स्वर्गीय श्री राम रतन रंगलालजी बाहेती अंध मुलींच्या प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र येथील ९० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी सामजिक विषयावर भाष्य करीत नाटक, भाषण तसेच देशभक्तीपर गीतांवर नृत्य आणि गायन करून आपले उत्स्फूर्त कलागुण सादर केले तसेच उपस्थितांची दाद मिळवली. लायन्स बालकाश्रमातील विद्यार्थ्यांनी भारतीय सेनेला सन्मानार्थ सादरीकरण करत युद्धातील शहिदांना आदरांजली दिली. सदर भावनिक सादरीकरणाने उपस्थितांना स्तब्ध केले. भगवानबाबा बालिकाश्रम येथील मुलीनी ‘तू चल’ या गाण्यावर नृत्य करीत स्त्री-शक्तीचा जागर जागर सादर केला, प्रस्तुत नृत्यामध्ये मुलीच्या जीवनातील प्रत्येक वळणावर होणारे विरोध ती स्फूर्तीने सामोरी जाऊन कशी यशस्वी होते, हे अचूक आणि उत्तमरित्या सादर केले. शोभना बालकाश्रम आणि बाबासाई एड्सग्रस्त मुलांचे बालगृह येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून कार्यक्रमातील जल्लोष टिकवून ठेवला. अंध आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली.

यावेळी पत्रकार तथा समाजसेविका डॉ. आरतीश्यामल जोशी (Dr. Aartishyamal Joshi) यांना पहिला ‘जाणीव पुरस्कारा’ने सन्मानीत करण्यात आले. क्रेझी फ्रेंड्स ग्रुप संस्था समाजातील प्रवाहापासून दुरावलेल्या वंचित, अनाथ, दिव्यांग, गतिमंद मुला-मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. संस्था चांगल्या आणि आनंदी समाजासाठी एक पाऊल पुढे टाकत यासाठी प्रयत्न करणार्‍या समाजातील निःस्वार्थ व्यक्तींना शोधून, त्यांच्या कार्याला गौरवान्वित करण्याच्या उद्देशाने, या जाणिवेला जपणार्‍या व्यक्तींच्या बहुमोल सामाजिक कार्यासाठी ‘जाणिव पुरस्कार’ यंदापासून सुरू केला. पत्रकार तथा समाजसेविका डॉ. आरतीश्यामल जोशी यांचे समाजातील वंचित, शोषित, दुर्बल अशा सर्वच घटकांना सामावून समाजाप्रती दिलेले असलेले भरीव योगदान विचारात घेता समाजसेविका रेणुका कड यांच्या हस्ते डॉ. आरतीश्यामल जोशी यांना संस्थेच्या वतीने पहिला जाणीव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी, श्रेया खोसरे यांनी वंदे मातरम गीत सादर करून कार्यक्रमाची रोमांचक सुरुवात केली. ज्यू. चार्ली सोमनाथ स्वभावाने यांनी विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. तसेच कमलेश राजकडे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीतून सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी मुकुंद चिलवंत, ऍड. राजेंद्र मुगदिया, ऍड. सिद्धार्थ साबळे, डॉ. मनोहर बन्सवाल, ज्येष्ठ पत्रकार आर. वाय. जाबा, डॉ. शहादेव पाटील, रुपेश कलंत्री, हिना जायलवाल आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे रोहित जाबा, बालाजी चव्हाण, उदय महाजन, मयुरी बसंते, पायल जाबा, कमलेश राजकडे, रोहिणी खैरे, ऋषिकेश धुळे, दिनेश गाडवे, रचना जाबा, शंतनू भवर, काव्य बरडिया, नागेश गाडवे, प्रणव गुळवे, ऋषिकेश नागापूरकर, मंगेश गाडवे, स्नेहल बसंते, ईश्वर ढोके आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या