Thursday, May 7, 2026
Homeदेश विदेशAxiom Mission 4: शुभांशू शुक्लांनी रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पोहोचणारे बनले...

Axiom Mission 4: शुभांशू शुक्लांनी रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पोहोचणारे बनले पहिले भारतीय

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर दाखल झाले आहेत. शुभांशू शुक्ला यांनी माझा प्रवास हा देशवासियांचा प्रवास असल्याचे म्हटले. ड्रॅगन अंतराळ यानाच्या डॉकिंगची प्रक्रिया सुरु आहे. या मिशनचे नेतृत्व भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला करत आहेत. ते आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात १४ दिवस संशोधन करणार आहे.

शुभांशू शुक्ला अंतराळातून पाठवलेला त्यांचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ते हसून म्हणाले की, “अंतरिक्षातून नमस्कार! एका लहान मुलाप्रमाणे मी अंतराळात चालणे-फिरणे आणि खाणे-पिणे शिकत आहे. मी खूप झोपत आहे.” त्यांचे हे शब्द भारताच्या या महत्त्वाकांक्षी प्रवासाची साधेपणाने पण दृढपणे ग्वाही देत आहेत.

- Advertisement -

एक्सिओम-4 (Ax-4) मिशनमध्ये भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचं ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रासोबत जोडलं गेलं आहे. आता ड्रॅगनच्या डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची आई डॉकिंगचं थेट प्रक्षेपण पाहून भावूक झाली.

भारतीय हवाई दलाने या क्षणाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले आहे की, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला एका ऐतिहासिक प्रवासावर निघाले आहेत. स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांनी ४१ वर्षांपूर्वी (१९८४ मध्ये) अवकाशात तिरंगा फडकवला होता. त्यानंतर आता ४१ वर्षांनी पुन्हा एकदा भारताचा सुपुत्र अंतराळात पोहोचला आहे. हे केवळ एक मिशन नसून, भारताच्या वाढत्या अंतराळ सामर्थ्याचे प्रतीक आहे.

शुभांशू शुक्ला एक्सिओम-4 मिशनद्वारे स्पेसेक्स ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रासोबत जोडले गेले आहे. ड्रॅगन कॅप्सूल निश्चित करण्यात आलेल्या वेळेपेक्षा २० मिनिटे अगोदर डॉक झाले. यानंतर १ ते २ तास पडताळणी केली जाईल. त्यानंतर हवेच्या दबावाची स्थिरता याची पुष्टी केली जाईळ. त्यानंतर अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात प्रवेश करतील.

राजनाथ सिंहांकडून आनंद व्यक्त
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “भारतसह ४ देशांच्या अंतराळवीरांना घेऊन जाणारे हे अंतराळ मिशन एक मैलाचा दगड ठरेल. देशाला त्यांच्यावर गर्व आहे. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि...