Friday, September 11, 2026
HomeनगरCrime News : संगमनेरच्या व्यावसायिकाची साडेपाच लाखांची ऑनलाइन फसवणूक

Crime News : संगमनेरच्या व्यावसायिकाची साडेपाच लाखांची ऑनलाइन फसवणूक

इन्स्टाग्रामवरील फ्रँचायजीच्या आमिषाला बळी || सायबर पोलिसात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवत संगमनेर येथील एका मेडिकल व्यावसायिकाची 5 लाख 50 हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात मंगळवारी (23 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावबाकी रोड, संगमनेर परिसरात राहणार्‍या 46 वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ते मेडिकल व्यवसाय करतात. त्यांना एका नामांकित डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची संगमनेर येथे फ्रँचायजी घ्यायची होती.

- Advertisement -

यासाठी त्यांनी इन्स्टाग्रामवर दिसलेल्या एका जाहिरातीतील फॉर्म भरून माहिती दिली होती. त्यानंतर मयांक गुप्ता नावाचा व्यक्ती (पूर्ण नाव माहिती नाही) तसेच परमार नावाचा व्यक्ती आणि प्रियंका नावाच्या महिलेने फिर्यादीशी मोबाईलव्दारे संपर्क साधला. त्यांनी स्वतःला संबंधित कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध शुल्क, नोंदणी प्रक्रिया आणि फ्रँचायजी मंजुरीच्या नावाखाली वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एकूण 5 लाख 50 हजार रूपये उकळल्याचा आरोप आहे. पैसे भरल्यानंतरही फ्रँचायजी मिळाली नाही.

तसेच संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळेनासा झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. या प्रकरणात आरोपींनी विविध मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल आयडींचा वापर केल्याचे समोर आले आहे. सदरचा प्रकार 20 मार्च 2026 ते 6 एप्रिल 2026 दरम्यान घडला असून फिर्यादीने 23 जून रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.

नागरिकांना आवाहन
सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा इतर ऑनलाइन माध्यमांवर दिसणार्‍या फ्रँचायजी, नोकरी, गुंतवणूक अथवा व्यवसायाच्या आकर्षक ऑफरवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित कंपनीची अधिकृत वेबसाइट, कार्यालय व संपर्क तपशीलांची खातरजमा करावी. कोणत्याही प्रकारचे शुल्क भरताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...