Sunday, June 14, 2026
Homeक्राईमबाभुळखेडा येथे जबरी दरोडा

बाभुळखेडा येथे जबरी दरोडा

सात तोळे सोन्यासह रोख रक्कम केली लंपास

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील बाभुळखेडा (Babhulkheda) या गावांमध्ये गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शिवशंकर बाबुराव कडू यांच्या घरावर दरोडा (Robbery) टाकला आहे. या दरोड्यात सात तोळे सोने तसेच काही रोख रक्कमेची चोरी (Theft) करून दरोडेखोर पसार झाले आहे.

- Advertisement -

याबाबतची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे (Newasa Police Station) पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ बाभुळखेडा येथे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून जखमींना उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. सदर घटनास्थळी अहमदनगर येथील पोलिसांचे श्वानपथक तसेच ठसे तज्ञ दाखल झाले. या घटनेमुळे नेवासा तालुका हादरून गेला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Solapur News : भीषण अपघात! पिकअप विहिरीत कोसळून 14 भाविकांचा जागीच...

0
सोलापूर । Solapur सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शनाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे....