Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजबदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा; म्हणाले, "आमचा मुलगा..."

बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा; म्हणाले, “आमचा मुलगा…”

ठाणे | Thane

- Advertisement -

बदलापुरातील (Badlapur) एका नामांकित शाळेत अक्षय शिंदे (Akshay Shinde) या नराधमाने दोन साडेतीन वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक (Arrested) करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिजे ही मागणी करत मुलींच्या पालकांसह बदलापूरकरांनी आंदोलन केले. मात्र, आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. या घटनेला चोवीस तास उलटताच आता अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा दावा त्याच्या आई वडिलांनी केला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अक्षय शिंदेचे आई-वडील (Parents) म्हणाले की, “दोन लहान चिमुकलींसोबत अक्षय शिंदेने जे काही केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तसला कुठला प्रकार घडलाच नाही. अक्षयला फसवले जात आहे.अक्षयचे काम बाथरुमच्या सफाइचे आहे, तो बाथरुममध्ये कसा जाणार, असा सवाल अक्षयच्या कुटुंबीयांनी केला आहे.तसेच, अक्षयची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करा”, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हे देखील वाचा : …तर न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार; शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम

तसेच आमच्या घरात लोक शिरले, आम्हाला मारहाण (Beating) करण्यात आली आणि घराबाहेर ढकलून दिले. तुम्ही इथे राहूच नका असे आम्हाला सांगितले. आमचं कुणी काही ऐकूनच घेतले नाही, असे आरोपी अक्षयचे आई-वडील म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : बदलापूर घटनेनंतर पालकमंत्री भुसेंनी घेतली नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक

नेमकी घटना काय घडली?

बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य केले. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती. दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी वेगळाच दावा केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या